Home यवतमाळ डॉ. अंजली गवार्ले मिसेस महाराष्ट्र 2022 पुरस्काराने सन्मानित

डॉ. अंजली गवार्ले मिसेस महाराष्ट्र 2022 पुरस्काराने सन्मानित

137

यवतमाळ – पुणे येथील अण्णाभाऊ साठे ऑडीटोरियम मध्ये मिसेस महाराष्ट्र 2022 घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरल्यामुळे यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मुळव्याध व भगंदर तज्ञ डॉ. अंजली गवार्ले यांना मिसेस महाराष्ट्र 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ही बाब यवतमाळकरांसाठी अभिमानाची असून या पुर्वी सुद्धा डॉ. अंजली गवार्ले यांना राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तसेच वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. अंजली गवार्ले यांना मिसेस महाराष्ट्र 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सौ. प्रज्ञा नरवाडे, सौ. डॉ छाया बिडकर, सौ भावना गुल्हाणे, सौ. शारदा कायदे, सौ. वर्षा चौधरी, सौ. मनिषा वानखडे आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सौ भारती जानी,सौ शीवानी पालडीवाल, सौ सविता सिधावर,सौ डोंगरे,श्री वेरुलकर यानी त्यांचा सत्कार केला