देगलूर – प्रतिनिधी
देगलूर , दि. २९ :- तालुक्यातील हणेगाव हे सर्वांत मोठे गाव म्हणन ओळखले जाते. सर्वांगीण विकासासाठी व जनसामान्यांची शासकिय कामे जलद गतीने होने आवश्यक आहे. प्रशासनाला गतिमान करण्यासाठी व आधिकऱ्याचा ताण कमी करण्यासाठी हे होणं गरजेचं आहे.
हणेगाव हे देगलूर तालुक्यातील सर्वात मोठे पंधरा हजार लोकसंख्या असलेलं गाव असून त्या परिसरात साठ गावे जोडली जातात व तेथे मोठी बाजार व व्यापारी पेठ आहे.तालुक्याच्या सर्व सोई सुविधा या ठिकाणी उपलब्ध आसून चार माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व कृषी उत्पन बाजार समिती कार्यरत आहे. औद्योगिक विकास वसाहतीसाठी व शासकिय कार्यालय बांधण्यासाठी शासकिय गायरान जमीन असून या करिता हणेगाव स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी हणेगाव चे नेते प्रा. शंकर राठोड यांनी केली यावेळी सौ शारदादेवी शंकरराव राठोड,गंगाधर दाउलवार, विष्णुकांत बंडेवार,नरसिंग अन्नमवार, रमेश राठोड, डॉ मोहन चव्हाण आदी उपस्तीत होते.