Home विदर्भ मोहित सहारे जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित.!

मोहित सहारे जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित.!

19
0

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २९ :- नेहमी ऐक व्याक्य म्हंटल जात आजची तरुणाई ही उद्याच भविष्य आहे. पण आजचा तरुण मोबाईल मध्ये ज्या दुनियेत कुठे तरी हरविले आहे.पण या सर्व गोष्टींला फाटा देत ऐक ध्येयवेड्या युवकाने तीन वर्षाआधी वंचितासाठी सुरू केलेली फूटपाथ स्कूल ची चालवत आज अवघ्या महाराष्ट्रभर सर्वाना माहिती आहे.याच उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्र शासचा जिल्हा क्रीडा विभाग वर्धा मार्फत दर वर्षी देण्यात येणार जिल्हा युवा पुरस्कार २०१८-१९ मोहित याला मिळाला. जिल्हा यूवा पुरस्कार हा दर वर्षी समाजात काही वेळ काम करणाऱ्या युवकांना देण्यात येतो.

हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनी शासकीय कार्यक्रमात स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे देण्यात आला.या वेळी मंत्री,पशु संवर्धन, क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार साहेब(महाराष्ट्र राज्य),जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे मॅडम, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे , जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली , जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार , अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे , अपर पोलिस अधिक्षक निलेश मोरे , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कारानंतर मोहित चे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी मोहित ला विचारले असता त्यांनी या पुरस्कार माझं नसून मी ज्याच्यासाठी काम करतोय त्यांनी त्यांनी मला काम करण्याची संधी दिली.हा फक्त माझं सन्मान नसून माझ्या पिढीशी खंबीर पणे उभे राहणाऱ्या माझे आई, बाबा,बहीण व माझ्या संपूर्ण टीम चा असल्याचे मोहीत यांनी सांगीतले.

Unlimited Reseller Hosting