Home यवतमाळ कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी तर्फे सौं. अर्चना धर्मे यांना “डॉक्टर ऑफ लिटरेचर” पदवी...

कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी तर्फे सौं. अर्चना धर्मे यांना “डॉक्टर ऑफ लिटरेचर” पदवी प्रदान

159

राळेगाव :- कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी, अमेरिका तर्फे यांच्याकडून दरवर्षी सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीनां दिली जाणारी डॉक्टर ऑफ लिटरेचर” (डी. लिट.) ही मानद पदवी राळेगाव येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. अर्चना धर्मे यांना दिनांक 28 मे रोजी मुबंई येथील दामोदर नाट्यगृह हॉल येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य ,जेष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा तसेच प्रमुख पाहुणे डॉ. स्नेहा देशपांडे ,अर्जुन यादव, कौतुक दांडगे, डॉ. डी एस तांडेकर, या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे या अगोदर सौ अर्चना धर्मे यांना नुकताच ” जीवन गौरव पुरस्कार” सुद्धा मिळाला होता व आता सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीनां दिली जाणारी “डॉक्टर ऑफ लिटरेचर” (डी. लिट.) ही मानद पदवी मिळाल्यामुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व गणमान्य व्यक्ती कडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे……..