Home बुलडाणा अहिल्यादेवींची जयंती म्हणजे महिलांचा सन्मान सोहळा:राधाताई पाटील

अहिल्यादेवींची जयंती म्हणजे महिलांचा सन्मान सोहळा:राधाताई पाटील

268

प्रतिनिधी:-(रवि अण्णा जाधव)

देऊळगाव मही:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने देशातील सर्व महिलांना सन्मान मिळवून देणारा हा सोहळा आहे, असे गौरवोद्गार ह भ प राधाताई पाटील यांनी देऊळगाव मही येथे बोलताना सांगितले.यावेळी राधाताई पाटील म्हणाल्या, की आपल्या देशात अनेक महान महिला होऊन गेल्या. त्यापैकी राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे नाव सर्वत्र अग्रक्रमाने घेतले जाते. मला कोणाची तुलना करायची नाही. मात्र, अहिल्यादेवींचे कार्य सर्वसमावेशक आहे. त्या खऱ्या अर्थाने ‘पुण्यश्लोक’ आहेत. त्यांनी कौटुंबिक संकटाच्या काळात राज्याची सूत्रे हातात घेऊन वेगळय़ा प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटवला. हाती असलेल्या सत्तेचा जनतेच्या हितासाठी कसा वापर करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व धर्म-जातींत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी चालवलेले प्रशासन हे आजच्या राजकीय नेत्यांसाठी पथदर्शक आहे, त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्याा पोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. कुशाग्र बुद्धीच्या अहिल्याबाईंवर सासऱ्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार अहिल्याबाईंवरच सोपवत. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्य आले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. यावेळी मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत तेव्हा त्यांच्या सल्ल्यानुसार अहिल्याबाई राज्यकारभार करत. मल्हाररावांच्या पश्चात २८ वर्षे अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला. त्या प्रजाहितदक्ष होत्या. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली. तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. वस्त्रोद्योगास प्रोत्साहन दिले. अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी जय मल्हार मित्र मंडळ सदस्यांनी सहकार्य केले