
➡️ घाटंजी पोलीसांची आयपिएल सट्टा जुगारावर दुसरी कारवाई.
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी येथील पोलीसांनी आयपिएल सट्टा जुगार सट्यावर धाड टाकून 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी उदय महेश गुप्ता (34), राम मंदीर वार्ड, घाटंजी यास अटक करून त्यांचे जवळुन 4 मोबाईल, रजिष्टर दोन, रोख 240 रुपये असा एकूण 39 हजार 340 रुपयाचा मुद्देमाल घाटंजी पोलीसांनी जप्त करुन आरोपी विरूध्द अपराध क्रंमाक 321/22 जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 (ब) (क), 5 जुगार कायदयातंर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात आणखी 4/5 आरोपी मिळण्याची शक्यता घाटंजी पोलीसांनी वर्तवली आहे.
घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम हे पुढील तपास करीत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटंजी शहरातील दिडशे मोहल्यात विद्युत झोतात मोबाईल वर बोलुन मोबाईल फोन द्वारे पंजाब विरुद्ध रॉयल चँलेजर बंगलोर या आयपिएल 20/20 क्रिकेट मँचचे मोबाईल मध्ये थेट प्रक्षेपण पाहुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सौदे करुन हार जीत क्रिकेट सट्टा जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध गुन्हे दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाँ. खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील (पांढरकवडा), ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम, जमादार राहुल खंडागळे, पोलीस शिपाई विशाल वाढई, पोलीस शिपाई मोनीका राउत आदीं पुढील तपास करीत आहे. दरम्यान, सात दिवसांपुर्वी घाटंजी पोलीसांनी आयपिएल सट्टा जुगारावर धाड टाकून 1 लाख 44 हजार 800 रुपये जप्त करुन दोन आरोपींना अटक केली होती, हे येथे उल्लेखनीय.











































