
खिर्डी ता रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथून दि १३ रोजी भरदिवसात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.खिर्डी खुर्द येथील रहिवासी शेख नाजीम शेख शरीफ यांच्या फिर्याद दिली की त्यांच्या मालकीची काळ्या रंगाची स्प्लेनडर प्रो गाडी क्रमांक एम.एच.१९ बी.एक्स.७९९० ही फिर्यादी व त्यांचा भाऊ गवंडी कामावर जातांना वापरतात तसेच दि १३ रोजी शुक्रवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास शेख नाजीम यांचा मुलगा नमाज पठणा साठी खिर्डी बुद्रुक येथील सुन्नी जामा मस्जिद येथे आला असता त्याने आपली मोटारसायकल मस्जिद येथून जवळील पशु वैधकीय दवाखान्याच्या गेट समोर लावून नमाज पाठणसाठी गेला नंतर दुपारी २:१५ च्या सुमारास नमाज पठण करून आल्यावर ज्या ठिकाणी त्याने मोटारसायकल लावली होती तिथे ती मोटारसायकल दिसुन न आल्यावर त्याने फिर्यादी शेख नाजीम यांना सांगितले असता फिर्यादी यांनी आपल्या नातेवाईक व मित्र मंडळींना गाडी बद्दल विचारले तडे त्या भागात व परिसरात ही गाडी चा शोध घेतला असता त्यांना त्यांची गाडी कुठेही सापडली नाही तेव्हा त्यांना खात्री झाली की आपली गाडी कोणी चोरट्यांनी चोरून नेली आहे.त्या अनुषंगाने त्यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंदवला सदर मोटारसायकल चोरीचा तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे सा. पो.निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रिजवान पिंजारी करीत आहे.











































