
स्व. बिंदुमाधव जोशी स्मृतीदिन यवतमाळात साजरा
यवतमाळ:- ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कटिबद्ध असून ग्राहकांनाही आपल्या शोषणाविरुद्ध संघर्ष करता यावा यासाठी त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी सुद्धा विविध प्रकारच्या माध्यामातून प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय भोसरेकर यांनी येथे केले.ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळ जिल्हा ग्राहक पंचायत तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.नारायण मेहरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा संघटनमंत्री हितेश सेठ, सचिव डॉ केशव चेटूले यावेळी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी स्वामी विवेकानंद व स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येवून दीप प्रज्वलन करण्यात आले.











































