Home जळगाव रावेर येथे कांताई नेत्रालयाच्या वतीने ८० रुग्णाची तपासणी करुण २१रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी...

रावेर येथे कांताई नेत्रालयाच्या वतीने ८० रुग्णाची तपासणी करुण २१रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

159

 

रावेर (शेख शरीफ)
रावेर येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज दि. १० मे मंगळवार रोजी कांताई नेत्रालयाच्या वतीने ८० रुग्णाची तपासणी करुण २१ रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

यावेळी कांताई नेत्रालयाचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करुन माहिती दिली.कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्रचिकित्सक डॉ. रोहित अग्निहोत्री यांनी ८० शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी २१रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगांव येथे कांताई नेत्रालेय हॉस्पीटलला पाठविण्यात आले.
कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील,वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, भाजपा अनु. जाती जिल्हा उपाध्यक्ष दिलीप लहासे, बबलुशेठ नगरीया, अर्जुन वाघ, विनोद तायडे,पत्रकार सुनिल चौधरी, (खान्देश माळी महसंघाचे ) तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन,फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील,चालक विनोद पाटील, यांच्या सह शिबीरार्थी महिला पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.