
कुंभार पिंपळगाव-आष्टी रोडवर भरदिवसा घडली घटना.
कारमधून आलेल्या दोन दरोडेखोरांकडून लूटमार..
घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ते आष्टी रोडवर मूर्तीफाटा येथे हरिभाऊ सोळंके यांचा श्रीकृपा पेट्रोलपंप आहे.
आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास या पेट्रोल पंपाचे मॅनेजर सय्यद नईम हे साडेसहा लाख रुपये रक्कम बँकेत भरण्यासाठी मोटरसायकलवरून कुंभारपिंपळगावकडे निघाले होते._
त्यांना इंडिका कारमधून आलेल्या दोन इसमांनी भररस्त्यात अडवून, गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील पैशाची बॅग घेऊन पोबारा केला.
आज कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजार असल्याने या रोडवर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ होती, तरीही दरोडेखोरांनी लूटमार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती कळताच घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.











































