Home बुलडाणा अमित राम जाधव यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर ,

अमित राम जाधव यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर ,

331

 

करोना काळात केलेल्या उत्कृष्ठ कार्याची शासनाने घेतली दखल ,

बुलढाणा ,

जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून २०२०- २१ मध्ये केलेल्या कामांचे मूल्यांकन करून या पुरस्कारासाठी सिंदखेडराजा पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले कर्तवयदक्ष ग्रामसेवक अमित जाधव यांची निवड करण्यात आली आहे . अमित राम जाधव हे सध्या तांदुळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत ते रताळी या गावात कार्यरत असतांना करोना काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल शासनाने घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला राज्यशासनाच्या निर्णयानुसार ग्रामविकास , ग्रामस्वच्छता , पर्यावरण , शिक्षण ,हगनदारी मुक्त गाव, आरोग्य , विकास योजना , उपक्रम , मिळकतकर वसुली अशा सर्व पातळ्यांवर सर्वोत्कृष्ट काम त्यांनी केले शिवाय ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे रहाणीमान उंचावनयास मदत करणाऱ्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात . त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते . यामधून ग्रामसेवक अमित राम जाधव यांची निवड करण्यात आली आहे . त्यांच्या या निवडी मूळे साखरखेर्डा व परिसरात आनंद वयक्त केले जात असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात असून ग्रामसेवक अमित जाधव हे जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष तथा गटनेते रामभाऊ जाधव यांचे चिरंजीव आहेत ,