Home यवतमाळ खासदार बाळु उर्फ सुरेश धानोरकर यांच्या हस्ते सगदा येथे दोन कोटी रुपयांच्या...

खासदार बाळु उर्फ सुरेश धानोरकर यांच्या हस्ते सगदा येथे दोन कोटी रुपयांच्या कामाचे भुमीपूजन..!

333

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील सगदा येथे रविवारी खासदार बाळु उर्फ सुरेश धानोरकर यांच्या हस्ते २ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला आर्णी – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळासाहेब धानोरकर, माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष अँड. शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला युवा नेते तथा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस बाळू मोघे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, श्रीनिवास नालमवार, ओंकार जिड्डेवार, दशरथ मोहुर्ले, गजानन गाऊत्रे, कुर्ली येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आकाश आत्राम, कुर्लीचे सरपंच सतीश गड्डमवार, ग्रामपंचायत सदस्य फुलचंद जाधव, माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार, वसंत कोवे, उत्तम शेंडे, झटाळाचे माजी उपसरपंच कमरखा पठाण, गजानन निलावार, रवी बोरेले, आकाश आत्राम या परीसरातील सरपंच, उपसरपंच व गावकरी आदीं उपस्थित होते. सदरचा रस्ता हा कुर्ली, नारायणपेठ, राजापेठ, सावंगी (संगम), सगदा येथून जाणारा रस्ता असुन या कामाची किंमत २ कोटी रुपये एवढी आहे. सगदा येथील रस्ता मंजुर झाल्याने गावातील नागरीकांनी या भागाचे लोकनेते शिवाजीराव मोघे आणि खासदार बाळसाहेब धानोरकर यांचे आभार मानले आहे.