
आरोपिंच्या ताब्यातुन १ चारचाकी वाहन व चोरी केलेला मुददेमाल एकुण किंमत ७,१८,७४०/- जप्त
मंगरुळपीर:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी गुन्हे गारी प्रवृत्तीला आळा बसावा याकरीता दिवसा / रात्री
गस्त वाढवुन पोलीसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक कायम ठेवला आहे. वाशिम जिल्हयात दिवसेंदिवस दुकान फोडण्याचे प्रमाण वाढीस लागले होते. दिनांक १३/०२/२०२२ रोजी फिर्यादी गजानन श्रीराम खरबळ रा रिसोड यांचे रिपोर्ट वरून पोस्टे रिसोड येथे अपन १००/२२ कलम ४६१,३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास वेगवेगळ्या ठिकाणी गस्त वाढवुन माहिती काढण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोपनिय माहिती मिळाल्याने आरोपी नामे १) जुला सोहीलमिया जुला बासीद वय २७ वर्षे रा.ताज नगर दिग्रस जि यवतमाळ २) शफीक उर्फ सरफराज मोमीन अलीम मोमीन वय ३३ वर्षे रा कळंब जि.ऊस्मानाबाद यांना सापळा रचुन ताब्यात घेतले व विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार) शेख फारूख शेख
हज्जु रा कळंब जि उस्मानाबाद व नप्पड उर्फ रईस रा माजलगांव बीड यांनी मिळुन रिसोड, शेलू बाजार व मालेगांव येथील दुकाने फोडुन लाखो रूपयाचा मुददेमाल चोरून नेला होता. त्यांनी वाशिम जिल्हयातील १) पो स्टे रिसोड अप क १०० / २२ कलम ४६१,३८० भादंवी, २) पो स्टे मंगरूळपीर अप क ६१ / २२ कलम ४६१,३८० भादंवी ३) पो स्टे मालेगांव अप क ३६ / २२ कलम ४६१,३८० भादंवी प्रमाणे तिन दाखल गुन्हयाची कबुली देवुन सदर
तिन्ही गुन्हयात चोरी गेलेला तांबा तार व पिव्हीसी वायर, बॅट-या व गुन्हयात वापरलेले कार असा एकुण किंमत
७,१८,७४०/- रूपये चा मुददेमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपी व मुददेमाल पोलीस स्टेशन रिसोड यांचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन रिसोड हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह साहेब, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे सा. यांचे.
मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथकातील सपोनि अतुल
मोहनकर, पोहवा सुनिल पवार, संतोष कंकाळ पोना अमोल इंगोले, राजेश गिरी, प्रशांत राजगुरु, राजेश राठोड, अश्विन जाधव पोकॉ अविनाश वाढे, संतोष शेनकुडे, गजानन गोटे, दिगावर मोरे यांनी सहभाग नोंदविला.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206











































