Home मराठवाडा महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे घनसावंगी तहसील कार्यालयात शुकशुकाट…

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे घनसावंगी तहसील कार्यालयात शुकशुकाट…

353

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – महसुल राज्य कर्मचारी संघटनेच्या संपामुळे तहसील कार्यालयातील काकाज ठप्प झाले असून यामुळे घनसावंगी तहसील कार्यालयात शुकशुकाट निर्माण झाला आहे.गेल्या आठवडाभरापासून तहसील कार्यालयात कामकाज बंद असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.महसुल राज्य संघटनेच्या प्रलंबीत सेवा विषयक मागण्या मान्य न होणे,राज्यामधील महसुल विभागीय रिक्त पदे भरण्यात यावीत,अव्वल कारकून,मंडळ अधिकारी संवर्गातून पदोन्नती बाबत प्रश्न प्रलंबीत आहेत.आश्वासनांची पुर्तरता होत नसल्यामुळे महसुल राज्य कर्मचारी संघटना ४ एप्रिल बेमुदत संपावर आहे.राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयातील अव्वल कारकून,महसूल सहाय्यक,शिपाई हे सर्व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करत आहेत.या संपामध्ये पेशकार आरबी माळी,एलएल वाघ,चव्हाण ,कलगुडे,शेंबडे,आशीश ढळे ,एस एस पेरके,अशोक बडवणे,सुशील जाधव यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.जवळपास आठवडाभरापासून सुरू असलेल्या महसुल राज्य कर्मचारी संघटनेच्या संपामुळे तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. परिणामस्वरूप तहसील कार्यालयात शुकशुकाट निर्माण झाला आहे याबाबत तोडगा काढून तहसील कार्यालयातील कामकाज सुरळीत करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.