श्री संतसेना व्यापारी प्रतिष्ठान, आणि श्री राम नवमी जन्मोत्सव समिती यवतमाळ यांचे तर्फेआज रामनवमी निमित्त शोभायात्रा समारोप कार्यक्रमाचे दत्तचौक यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले होते. तसेच मागील कोविड काळात ज्या काही सामाजिक संस्थांनी चांगली कामगिरी बजावली, अश्या सामाजिक संस्थांचा सत्कार देखील करण्यात आला , मागील कोविड काळात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्णांना शासकीय रुग्णालयात रक्त पुरवून रुग्णांचे प्राण वाचविल्या बद्दल निस्वार्थ सेवा फाउंडेशन यवतमाळ यांना सन्मानित करण्यात आले.

