Home मराठवाडा ई- पॉस मशीन नवीन किंवा अद्यावत द्याव्यात , स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे...

ई- पॉस मशीन नवीन किंवा अद्यावत द्याव्यात , स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

227
0

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

,जालना – ई पॉस मशीनला सातत्याने येत असलेल्या समस्यामुळे ई पॉस मशीन नवीन किंवा अद्यावत करून द्याव्या व विविध मागणी अंबड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दि १ एप्रिल रोजी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या दरम्यान ई पॉस मशीन तहसिल कार्यालयात जमा करण्यासाठी अंबड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार गेले असता तुम्ही मशीन जमा करून नका तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्याचा पाठपुरावा करण्यात येईल असे तहसीलदार यांच्या वतीने अनिता मोरे अव्वल कारकून पुरवठा विभाग यांनी सांगितले. व अंबड स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की २०१७ पासून ई पॉस मशीन गेले पाच वर्ष चालवत आहोत मात्र तीन चार महिन्यापासून रेंज व्यवस्थित राहत नाही, सर्व्हर नेहमी डाऊन राहतो,ई -पॉस मशीन वर वारंवार service not responding for request,technical error plz try again,request time out plz try again,अँटीना व्यवस्थित चालत नाही, बॅटरी टिकत नाही,एक पावती काढण्यासाठी पाच ते सात मिनिटं लागत आहे,ई पॉस मशीन दुरुस्ती सेवा तालुका स्तरावर नाही.मशीन मध्ये कोणत्या महिन्याचा डेटा आहे याचा उल्लेख नसतो अश्या समस्या येत आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना कार्ड धारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
या निवेदनावर अंबड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संभाजी कळकटे,दुर्गदास पाटील, चुन्नीलाल चव्हाण,सखाराम सोळुंके, दिलीप पवार,नंदकुमार तारख,अण्णासाहेब सोळुंके,रिजवान खान पठाण,सुभाष पांगर,पी. डी. बिडकर,श्रीकांत खरात,प्रकाश खरात आदींच्या सह्या आहेत.

या आहेत मागण्या

१) माहे नोव्हेंबर २०२१ मधील अंबड तालुक्यातील दुकानदाराचे मोफत व नियमित योजनेचे राहिलेले धान्य देण्यात यावे.
२) माहे फेब्रुवारी २०२२ चे नियमित चे धान्य लवकर उपलब्ध करून द्यावे.
३) माहे मार्च २०२२ चे नियमित चे धान्य लवकर उपलब्ध करून द्यावे.
४) ई पॉस मशीन व द्वारपोच बाबत समस्या आहेत.
५) नवीन किंवा अद्यावत ई पॉस मशीन द्याव्यात

फोटो: अंबड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे निवेदन स्वीकारताना अनिता मोरे अव्वल कारकून पुरवठा विभाग अंबड

Previous articleकारंजा तालुक्यातील राजनी येथे खुलेआम जुगार अड्डा सुरु.
Next articleतुळजा भवानी मातेच्या मंदिर कळसावर पहाटे उभारली गुढी, देवीला खास दागिन्यांनी सजवलं
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.