Home यवतमाळ गोदावरी” च्या दायित्वातून बसस्थानकावर बैठक व्यवस्था

गोदावरी” च्या दायित्वातून बसस्थानकावर बैठक व्यवस्था

53
0

 

 छत्रपती शिवराय चौकात दिले बेंच भेट

हरीश कामारकर/महागाव

महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरा संगम बसस्थानक चौकात प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था नसल्याने आज गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट कॉ -ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या.नांदेडच्या वतीने बसस्थानकावरील छत्रपती शिवराय चौकात सिमेंट बेंच देऊन सामाजिक दायित्व जोपासले.
एस. टी. महामंडळाचा प्रवासी निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने महिला प्रवासी व विद्यार्थीनींना वाहनांच्या प्रतीक्षेत थांबण्यासाठी बसस्थानकावरील दुकानाचा किंवा हॉटेलांचा आश्रय घ्यावा लागत आहे. याच बरोबर स्थानिक राजकीय उदासीनता व अकार्यक्षमता यामुळे बसस्थानक परिसरात प्रवासी निवारा, लघुशंके करिता मुत्रीघर नसल्याने प्रवाश्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यामुळे येथील छत्रपती शिवराय तैलचित्र अनावरण समितीने गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट कॉ -ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या.नांदेड च्या अध्यक्षा सौ.राजश्रीताई हेमंत पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्याकडे ही बाब लक्षात आणून दिली. या परिस्थितीवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी बँकेच्या वतीने येथे सिमेंट बेंच देऊन प्रवाशांना आसन व्यवस्था उपलब्ध करून दिली.
छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून आज या बेंचचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी हिवरा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विजयराव बोंपिलवार,हिवरा पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवानराव फाळके,माजी सरपंच डॉ.धोंडिराव बोरूळकर, गोदावरी अर्बनचे महागाव शाखाधिकारी निलेश वाकोडे साहेब,सहाय्यक शाखाधिकारी गोपाल खोडके, सचिन हिंगडे,राम शिंदे,पत्रकार संदिप कदम,छत्रपती शिवराय तैलचित्र अनावरण समितीचे मुकुंद जामकर,सुनिल चव्हाण,राम जाधव शेख फिरोज,किरण काळे,गजानन ठमके,किशन गिरी,महेश कामारकर उपस्थित होते. बँकेच्या या सामाजिक उपक्रमातून सर्वच स्तरातून कौतुक होत असून प्रवाशी आभार व्यक्त करत आहे…

Previous articleकवठा गांवानजीक वाघाचा तिघांवर हल्ला ; हल्ल्यात एक ईसम गंभीर जखमी..!
Next articleकृषी विस्तार अधिकारी सात हजारांच्या लाचेच्या जाळ्यात.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.