Home यवतमाळ कवठा गांवानजीक वाघाचा तिघांवर हल्ला ; हल्ल्यात एक ईसम गंभीर जखमी..!

कवठा गांवानजीक वाघाचा तिघांवर हल्ला ; हल्ल्यात एक ईसम गंभीर जखमी..!

305

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी – घाटंजी तालुका लगतच्या पांढरकवडा वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत कवठा गावांजवळ वांजरी रस्त्याजवळच्या शेतात बजरंग बली मंदीर बांधनीचा कार्यक्रम होता. त्या मुळे सदर कार्यक्रमाला गावांतील अनेक नागरीक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला वैभव भोयर सह तिघें कार्यक्रमाला जात असतांना अमरदीप घडसनवार यांच्या शेतात वाघाने तिघांवर हल्ला केला. ईतर दोन युवक आरडा ओरड करत असतांना प्रविण मिसार हा हातात काठी घेऊन धावत आला.

त्यामुळे वाघ हा घाबरुन पळुन गेला. वाघाच्या हल्यात तिघेंही जखमी झाले. मात्र, वैभव गंगाधर भोयर (वय – २५) हा गंभीर रित्या जखमी झाला. जखमी वैभवला प्रथम पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे वनविगाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहचले होते, अशी माहिती मिळत आहे. या आधी सुद्धा कवठा या गांवी काही वर्षांपूर्वी प्रल्हाद मडावी या ईसमांवर वाघाने हल्ला केला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला होता, हे विशेष. कवठा नजीक वाघाच्या हल्ल्याने परीसरातील शेतकरी, शेतमजुर व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कवठा येथील सरपंच महेंद्र भोयर यांचेशी संपर्क केला असता, वाघाच्या हल्याने कवठा परिसरात दहशत पसरली असून जंगलाला कंपाऊंड करुन वाघाला जेरबंद करुन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी, सरपंच महेंद्र भोयर यांनी पांढरकवडा येथील उप वन संरक्षक किरण जगताप यांचे कडे केली आहे. विशेष म्हणजे आज दिनांक २४ मार्च रोजी कवठा येथे वरिष्ठ वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केल्याचे सरपंच महेंद्र भोयर यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, पांढरकवडा येथील वन परिक्षेत्र अधिकारी सुरवसे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.