
वाशिम:-पोलीस दलामध्ये 16 सप्टेंबर 2021 पासुन डायल 112 हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला असुन या प्रकल्पाचा उददेश पिडीत जनतेला आधुनिक साधन व तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी वेळेत मदत पोहचविणे हा आहे.
वाशिम जिल्हयातील पोलीस स्टेशन धनज येथे दिनांक 17.03.2022 रोजी 14.28 वा चे सुमारास तकारदार श्याम लच्छीराम पवार रा. पिंपरी मोडक ता कारंजा पोलीस स्टेशन धनज यांनी तक्रार दिली की, ग्राम पिंपरी मोडक येथील सागर मेडीकल च्या बाजुला 15 ते 20 इसमांनी खुन केला असुन त्वरीत पोलीस मदत पाठवा असा कॉल
प्राप्त झाल्याने त्यानुसार नियत्रंण कक्ष वाशिम येथुन धनज पोलीस स्टेशन येथे डायल 112 चे कर्तव्यावर असलेले
पोलीस अंमलदार पोहेकॉ डिंगाबर राठोड बन 53 व चालक पोलीस कॉन्स्टेबल अफसर रायलीवाले बन 885 यांना ग्राम पिंपरी मोडक येथे गंभीर घटना असल्याने त्वरीत रवाना करण्यात आले. डायल 112 च्या कर्तव्यावर असलेला स्टाप यांनी डायल 112 वर कॉल करणा-या तकारदार यांचा शोध घेवुन त्यांना घटनेबाबत विचारपुस केली असता मी असाच सहज कॉल केला असल्याचे सांगितले व पोलीस आम्हाला वेळेत मदत करतात की नाही व पोलीसांची
मज्जा घेण्यासाठी कॉल केल्याचे तकारदार यांनी सांगितले.डायल 112 चे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार यांनी सदर तकारदार यांनी खोटी तकार दिल्या बाबत
पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि अनिल ठाकरे यांना माहिती देवुन सदर तकारदार यांनी खोटी तकार दिल्याने
व पोलीसांची दिशाभुल केल्याने सदर इसमाविरूध्द पोहेकॉ डिंगावर राठोड ब न 53 यांचे फिर्यादी वरून कलम
177 भादंवि प्रमाणे अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी मा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांनी वाशिम जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन केले की, डायल 112 हा टोल फ्री क्रमांक जनतेच्या सेवेसाठी व तात्काळ पिडीत नागरीकांना पोलीसांची मदत पोहचविण्यासाठी असुन त्यामुळे गरजेच्या वेळीच त्याचा सदुपयोग करावा व डायल 112 या टोल फ्री क्रमांकावर कोणीही खोटे कॉल करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206











































