Home जळगाव संगीता अंभोरे यांची शिवअंगणवाडी सेनेच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती

संगीता अंभोरे यांची शिवअंगणवाडी सेनेच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती

286

 

रावेर (शेख शरीफ)
शिवसेना भवन मुंबई येथे महाराष्ट्र शिवअंगणवाडी सेनेच्या वतीने राज्य अध्यक्षा सारिका सावंत व राज्य उपाध्यक्षा रंजना कुलकर्णी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक पदी संगीता अंभोरे यांची निवड करण्यात आली तर संभाजीनगर शहर जिल्हा संघटक पदी राखी सुरडकर, व अलका कांदे यांची निवड करण्यात आली .

संगीता अंभोरे – जिल्हा संघटक (कार्यक्षेत्र -सिल्लोड- सोयगाव, फुलंब्री, पैठण विधानसभा) राखी सुरडकर जिल्हासंघटक (कार्यक्षेत्र – पूर्व, पश्चिम आणि मध्य संभाजीनगर शहर) जिल्हासंघटक संभाजीनगर ग्रामीण अलका कांदे (कार्यक्षेत्र – कन्नड, वैजापूर, गंगापूर – रत्नपुर विधानसभा) यावेळी मराठवाडा सरचिटणीस मंजुषा नागरे, रेणुका जोशी, रुपेश कांबळे शिवसेना संपर्कप्रमुख वर्धा हिंगणघाट, सुरेखा गव्हाणे संपर्कप्रमुख अहमदनगर संगमनेर -अकोले, सुप्रिया ठोंबरे, साधना राऊत आदींची उपस्थित होती.