Home मराठवाडा छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने सुखापुरी हायस्कूल येथे शिवचरित्राचे वाटप

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने सुखापुरी हायस्कूल येथे शिवचरित्राचे वाटप

420

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – सुखापुरी येथील सुखापुरी हायस्कूल सुखापुरी येथे दि.२८ रोजी ६० शिवचरित्राचे वाटप करण्यात आले. छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुखापुरीचे सरपंच भगवान राखूंडे,छात्रभारतीचे मार्गदर्शक रमेश पटेकर,शाळेचे समन्वयक आर.डी. पारडकर,मुख्याध्यापक किशोर ढाकणे, फकिर मोहम्मद बागवान यांची उपस्थिती होती.

अंबड तालुक्यातील सुखापुरी हायस्कूल येथे वाटप करण्यात आल्या. यावेळी छात्रभारतीचे मार्गदर्शक रमेश पटेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना बोलले की, देशात एकीकडे शाळा- कॉलेजांमध्ये धर्मांध शक्ती द्वेषाचं वातावरण पेटवत आहेत. म्हणून अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन एकतेची प्रेरणा देणारे लोककल्याण राजा छत्रपती शिवराय यांचे विचार प्रत्येक विद्यार्थी-तरुणांच्या मनामनात-घराघरात पोहचवण्याची गरज आहे. आदर्शवत राजा, आदर्शवत राज्य, आदर्शवत प्रशासन, आदर्शवत शासन कसे असावे? जनकल्याणकारी राज्याची संकल्पना काय आहे हे नव्या पिढीच्या समोर आले पाहिजे. या प्रयत्नाचा भाग म्हणून शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ” शिवाजी कोण होता?” हे पुस्तक ५ लाख विद्यार्थी तसेच तरुणांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला आहे. केवळ पुस्तक वाटपच नव्हे तर हे पुस्तक मुलांनी वाचावे, यासाठी सदर पुस्तकावर निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करणार असल्याचे छात्रभारतीचे मार्गदर्शक रमेश पटेकर यांनी यावेळी सांगितले.