Home विदर्भ पिपल्स रिपब्लिकन पार्टीची आढावा बैठक संपन्न

पिपल्स रिपब्लिकन पार्टीची आढावा बैठक संपन्न

143

 

अमरावती ::धामणगांव रेल्वे तालुक्यातील पिपल्स रिपब्लिकन पार्टी ची कार्यकर्ता आढावा बैठक आज दि.26 फेब्रुवारी रोजी दुपारी विश्राम गृह धामणगांव रेल्वे येथे संपन्न झाली.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा. चरनदासजी इंगोले उपस्थित होते.यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकिच्या तयारी च्या अनुषंगाने आढावा घेऊन दोन उमेदवार निश्चित करून त्यांना त्यांच्या मतदान संघात आतापासून च निवडणूक लढवायचा तयारीला लागण्याचे आदेश यावेळी पक्षाकडून देण्यात आले. यावेळी आढावा बैठकीला उपस्थित पक्षाचे कार्याध्यक्ष मा. चरनदासजी इंगोले यांनी मार्गदर्शन केले.बैठकीला उपस्थित जिल्हा कार्याध्यक्ष मा. मुकुंदभाऊ रंगारी,, युवा अध्यक्ष आकाश मुन, व तालुक्यातील असंख्य पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी ::प्रशांत नाईक