Home जळगाव रावेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कॉग्रेस च्चा वतीने अल्पसंख्याक मंत्रीं नबाब मलिक...

रावेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कॉग्रेस च्चा वतीने अल्पसंख्याक मंत्रीं नबाब मलिक यांच्यावर झालेल्या इडीच्या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन व निवेदन

284

 

रावेर (शेख शरीफ)
नवाब मलिक यांना इडी ने अटक केल्यानंतर त्याचे जिल्हा सह पडसाद उमटले असुन रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्ते यांनी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले,केंद्र सरकार हे सरकारी एजंन्सी चा गैर वापर करून जाणूनबुजून महाविकास आघाडी सरकारला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे असे कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे,

जेव्हापासून महाराष्ट्रातील भाजपा सरकार यांचे राज्यातील सरकार गेले तेव्हापासून राज्यातील महाविकास आघाडी शासनातील मंत्री,नेते व यांना जाणून बुजून केंद्र सरकारकडून इडी चा दरारा दाखवुन राज्य शासन कमकुवत आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणारे केंद शासन महाराष्ट्रातील शासन असलेल्या आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे केंद्र शासनाकडून लावलेल्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार आहे असे यावेळी बोलतांना सांगितले .