
दारव्हा (प्रतिनिधी):- शहरातील कारंजा बायपास ते रेल्वे स्टेशन रोड पर्यंत हा रोड रस्ता अत्यंत गर्दीचा व वाहतुकीचा असल्यामुळे सध्या मात्र वाहतुकीची कोंडी होतांना दिसत आहे.

रोड रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामात दारव्हा नगर परिषद पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन येत असल्यामुळे ते शिफ्टींग चे काम ईगल कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्या खाजगी कंपनीला (नालमवार) यांना देण्यात आल्याचे समजते.परंतु पाणी पुरवठा योजनेचे जुने पाईप खाजगी कंपनी (नालमवार) कामगार मात्र ते काढलेले पाईप रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पद्धतीने टाकत असल्यामुळे दोन वाहन धारक एकावेळी रस्ता ओलांडताना जर मोटर सायकल धारक किंवा पायदळ जाणाऱ्या नागरिकांनी कुठून जायचे असा प्रश्न सामान्य नागरिक व वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना पडला आहे.कारण ठिकठिकाणी पाईप व मातीचे ढिगारे पडलेले असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्वरित रस्त्यातील अस्ताव्यस्त असलेले पाईप हटविण्यात यावे असे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी ईगल कंपनी व पाईप लाईन शिफ्टिंग कंपनी यांना प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.











































