
बुलडाणा (प्रतिनिधी)भारतासारख्या विशाल देशात असंख्य महामानवांनी जन्म घेतला या महामानवांनमूळे समाज स्वस्थ टिकून राहण्यास मदत झाली,त्यात गुरू रविदास हे अग्रभागी होते,त्यांनी समाजाला नितीमत्तेचे धडे देऊन मानवतावाद टिकविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश डोंगरे यांनी गुरु रविदास महाराज मंदिर धाड नाका येथे अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेच्या वतीने दि.16 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश डोंगर होते तर राज्य ऊपाध्यक्ष के.एम.वैरी, डाॅ बबनराव परमेश्वर, दिपक पुरभे,इंजि.शिवाजी जोहरे,सुबाश बीबे,छगन शिराळे, अनिल बोरकर,दिपक निंबोळे,संजय उबाळे
प्रशांत कुडके समाधान चिंचोले,पी.पी.काकडे,यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचलन अनिल बोरकर यांनी तर आभार दिपक निंबोळे यांनी मानले










































