Home अहमदनगर अकरा वर्षा पूर्वी सिंदखेडराजा येथे झालेल्या खून प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

अकरा वर्षा पूर्वी सिंदखेडराजा येथे झालेल्या खून प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

691

११ वर्षांपुर्वी सिंदखेडराजा येथे वाहन चालकाच्या खुनाचा गुन्हा घडला !

आरोपी होता फरार,मात्र अहमदनगर पोलिसांनी शिताफीने पकडला !!

खरं “भरत”नांव लपवून खोटा “अभिमान” झाला !
मात्र पोलिसी खाक्या दाखवताच ठिकान्यावर आला !!

श्रीरामपूर शौकतभाई शेख

गुन्हेगार कितीही जरी हुशार आणि चतुर असला तरी तो अधिक काळ पोलिसांच्या नजरेपासून दुर राहु शकत नाही, एकनाएक दिवशी पोलिस त्याच्या मुसक्या आवळणार म्हणजे आवळणारच,यात कोणतीच शंका नाही आणि त्यात अहमदनगर पोलिस म्हणजे राज्यात अव्वल नंबर पोलिस असल्याचे आपण जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्यासह अहमदनगर स्थानिक गुन्हा शाखेचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अनिल कटके श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदिप मिटके, शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप आणि आणखी काही अहमदनगर (उत्तर/दक्षिण) जिल्ह्यातील कर्तबगार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगीरीचा पराक्रम बघतच आहोत,
मात्र ११ वर्षांपूर्वी सिंदखेडराजा (जि बुलढाणा) येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी लावत आरोपीस शिताफीने जेरबंद करावे ही बाब खरोखरच अहमदनगर पोलिसांची आणखी मान उंचावणारी अशीच आहे.अशा या कर्तबगार पोलिस दलाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास शतशः प्रणाम.

सविस्तर असे की,११ वर्षापुर्वी एका ड्रायव्हरचा खुन करुन प्रेत सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळुन पुरावा नष्ट करुन आज पावेतो नावात बदल व ओळख लपवुन राहणारा आरोपी अहमदनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने जेरबंद केला आहे.
नाशिक परिक्षेपत्राचे पोलीस उप महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे ना उघड खुन,दरोडा, जबरी चोरी उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते.
सदर आदेशान्वये अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेवुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते, त्यानुसार वर नमुद सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. १०७/२०११
भा.दं.वि.कलम ३६४, ३९४, ३४ प्रमाणे घातपाताचे दृष्टीने अपहरण व जबरी चोरी करण्याचे उद्देशाने गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे भरत मारुती सानप हा अद्याप पावेतो फरार असुन, अपहरण
इसमाचा काहीएक थांगपत्ता लागलेला नाही, यामुळे
सदर गुन्ह्याची त्यांनी अधिक माहिती घेतली असता समजलेली माहिती अशी की, दि २३/०३/११ रोजी फिर्यादी
नितीन सखाराम सोनवणे (वय २४ ) धंदा ड्रायव्हर, रा. यमुनानगर, सर्वे नं. १९९, विमाननगर, पुणे – नगर रोड,
पुणे-१४, यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे की, दि.११/०३/११ रोजी फिर्यादीचा भाऊ नामे अनिल
सखाराम सोनवणे, वय-२९ हा व त्याचा ड्रायव्हर नामे भरत मारुती सानप रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जिल्हा बीड असे त्याचे जवळील माल ट्रक क्र. एम.एच.१२- ए.व्ही.-६४४९ अशी सोबत घेवुन रायपुर येथे बायडींग वायर
भरण्यायाठी गेले होते. दि.१६/०३/११ रोजी रायपुर येथुन ५,४८,९४०/- रु.ची बायडींग वायर भरुन पुणे येथे येण्याकरीता निघाले होते. दि.१८/०३/११ रोजी सकाळी ते जालना येथे आले, बाबत फिर्यादीचा भाऊ अनिल सोनवणे याने फोन करुन कळविले होते.त्यानंतर त्याचा फोन लागला नाही. दि २१/०३/११ रोजी सदरची मालट्रक ही बेवारस अवस्थेमध्ये भगवानगड, ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे मिळुन आली होती. सदर ट्रक मधील बायडींग वायर नव्हती तसेच ट्रकचे कॅबीनमध्ये रक्ताचे डाग दिसले होते. तसेच भाऊ अनिल सोनवणे याच्या सोबतचा ड्रायव्हर नामे भरत सानप याचा फोन बंद होता. यावरुन भरत सानप याने फिर्यादीचा भाऊ अनिल सोनवणे यास जबर मारहाण व घातपात करण्यासाठी अपहरण करुन ट्रक मधील ५,४८,९४०/- रुपये किमतीची बायडींग वायर बळजबरीने चोरुन नेली आहे. या बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील प्रमाणे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील आपले सहकारी अधिकारी,कर्मचारी
स.पो.नि.गणेश इंगळे, स.फौ.राजेंद्र वाघ,संजय खंडागळे, पो.हे.कॉ.बापुसाहेब फोलाने,पो.ना.भिमराज खर्से,सुरेश माळी, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी,देवेंद्र शेलार व चा.पो.हे.कॉ.बबन बेरड यांचे स्वंतत्र पथक स्थापन करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सुचना व मार्गदर्शन करुन सदर गुन्ह्यातील फरार आरोपी बाबत माहिती घेवुन त्यास अटक करणे बाबत आदेश दिले,आणि पोलिस तपासचक्रे वेगाने फिरु लागले,
नमुद आदेशान्वये पथकाने गुन्हा व गुन्ह्यातील आरोपी बाबत माहिती घेतली असता आरोपी नामे भरत मारुती सानप रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जिल्हा बीड हा सध्या कन्हेरवाडी, ता. परळी, जिल्हा बीड येथे
स्वतःचे नावात बदल करुन व ओळख लपवून राहत आहे.अशी खात्रीशीर माहिती तपास पथकास मिळाल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीचा शोध घेवुन त्यास कन्हेरवाडी, ता. परळी, जि. बीड येथुन ताब्यात घेतले.पोलिसांनी त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव अभिमान मारुती सानप, वय ३७, रा. खडकवाडी, ता.पाटोदा, जि.बीड असे चुकीचे नाव सांगुन पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली व मी अभिमान मारुती सानप असुन तसे आधारकार्ड
पथका समक्ष सादरही केले. परंतु तपास पथकाची पुर्णखात्री होती की, सदरचा इसम हाच भरत मारुती सानप आहे. त्यामुळे पथकाने त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या ओळखी बाबतच्या अन्य
कागदपत्रांची सखोल पडताळणी केली तर त्यामध्ये त्याच्याकडे सन २००६ मधील मतदान ओळखपत्र सापडले त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असे असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी मात्र यावेळी आपला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटाप्रमाणे बोलु लागला आणि आपणच भरत मारुती सानप असल्याचे कबूल करत पाथर्डी पोलीस स्टेशन मधील दाखल गु.र.नं. १ १०७/२०११ भा.द.वि.कलम ३६४, ३९४, ३४ सदर गुन्हा आपणच केल्याचे मान्य केले, मात्र मला पोलीसांनी पकडु नये म्हणुन मी माझी ओळख लपवुन नावात बदल करुन भरत ऐवजी
अभिमान या नावाने राहत होतो.अशी कबुली दिली,
आणि याविषयी सदरील गुन्ह्यांबाबत तो असेही म्हणाला की अनिल सोनवणे हा नेहमी मला माझ्या पत्नी विषयी वाईट बोलायचा, त्याचा माझ्या मनात खुप राग होता, म्हणून देवरीगाव, जिल्हा गोंदिया येथे ट्रकचे टायर मधील हवा चेक करण्यासाठी
आम्ही थांबलो होतो.त्यावेळी आमचेमध्ये चांगलेच वाद झाले होते,मला त्याचा राग आल्याने मी त्याचे डोक्यात टायर मधील
हवा चेक करण्यासाठी टायर वाजवण्यासाठी माझ्या हातात असलेला व्हील पान्हा मी त्याच्या डोक्यात मारला होता त्यावेळी तो जागेवर बेशुध्द झाल्याने मी त्यास तसाच उचलुन गाडीचे केबिनमध्ये टाकला होता. मी ट्रक चालवित
सिंधखेडराजा, (जि. बुलढाणा) येथे आल्यावर अनिल सोनवणे याची हालचाल बंद झाल्याने तो मयत झाला आहे असे समजुन मी त्यास सिंधखेडराजा -जालना जाणाऱ्या रोडवरील खदान जवळ नाल्यावरील पुलाजवळ ट्रक
थांबवुन ट्रक मधील अंथरुन व पांघरुन घेण्याचे कपडे व नाल्या जवळील सुकलेले गवत त्याचे अंगावर टाकुन त्यास पेटवुन देवुन तेथुन निघुन आलो व त्यांनतर माझ्या ‘ओळखीचे (१) सुनिल आश्रुबा सानप (२) परमेश्वर
उत्तम दराडे यांचे मदतीने ताब्यातील ५,४८,९४०/- रु.कि.ची बायडींग वायरची विल्हेवाट लावली होती.
अशी हकिगत आरोपी नामे अभिमान ऊर्फ भरत मारुती सानप सांगीतल्याने सदर बाबतची खात्री करण्यासाठी पोलीस पथक सिंदखेडराजा पोलीस स्टेशन, (जि. बुलढाणा) येथे जावुन पोलीस स्टेशन कडील
अभिलेखाची खात्री केली असता दिनांक १९/०३/२०११ रोजी सिंदखेडराजा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२२/११ भादविक ३०२, २०१ प्रमाणे खुन करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले आहे. सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मिळुन न आल्याने गुन्ह्याची अ-वर्ग समरी करुन गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आलेला होता.वरील प्रमाणे गुन्ह्यांची खात्री होवुन आरोपी निष्पन्न झाल्याने तपास पथकाने आरोपीस नामे अभिमान ऊर्फ भरत मारुती सानप यास ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी
पोलीस स्टेशन करीत आहे.
अशा प्रकारे पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल अपहरणाचे गुन्ह्यात आरोपीस अटक करुन ११ वर्षापुर्वी घडलेल्या व सध्या गुन्ह्याची अ-वर्ग समरी करुन गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आलेल्या खुनाचा गुन्हा उघडकिस आणुन आरोपीस जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सदरची कारवाई ही नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील व अहमदनगर पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक सौरभ कूमार आगरवाल,शेवगांव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आणि
त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार,कर्मचारी यांनी केलेली आहे.असे अहमदनगर पोलिस अधीक्षक
मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.पोलिसांंच्या अशा या उत्कृष्ट कार्यांची संपूर्ण जिल्ह्यातून कर्तबगार पोलिस दलाचे अभिनंदन केले जात आहे.