
यवतमाळ -: यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक ते पुनम चौक हा प्रमुख मार्ग असून या मार्गावर अनेक खाजगी दवाखाने,मेडिकल्स, भाजीपाल्यांची दुकाने तसेच इतरही दुकाने असून या रस्त्यावर सदैव वर्दळ असते,मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने अमृत योजनेची पाइपलाइन टाकण्यासाठी त्या भागांमध्ये अर्धा रस्ता खोदून ठेवले आहे.तसेच खोदून टाकलेली माती अक्षरशः रस्त्यावर पसरलेली आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ही संबंधित कंत्राटदाराने त्या रस्त्याची थातूरमातूर डागडुजी केली असून त्या ठिकाणी माती पडलेली असल्याने अपघाताची दाट शक्यता आहे.यामुळे या रस्त्याचे काम व्यवस्थित दुरुस्त करून द्यावे अशी मागणी भाई अमन यांनी केली आहे.
शहरातील अनेक रस्ते अमृत योजनेच्या नावाखाली ठिकाणी खोदून ठेवण्यात आले असून त्या खड्ड्यात अपघाताची शक्यता आहे.विशेष म्हणजे पाईप लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाल्या वर त्या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याचे ठरल्याप्रमाणे केल्या जात नाही.या मुळे अनेक अपघात घडत आहे.अश्याच प्रकारे यापूर्वीही स्टेट बँक चौक ते अप्सरा टॉकीज चौक चर्च रोड समोर एक भला मोठा खड्डा खोदून ठेवला होता त्या खड्ड्यामध्ये पडून एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाला होता अखेरपर्यंत त्या इसमाचा शोध घेण्यास पोलिसांनाही यश आले नाही त्या प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात पडला असून तसेच त्या घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित कंत्राटदाराला का यादीत टाकण्याची प्रक्रिया थंडबस्त्यातच गेली.अमृत योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला दर महिन्याला अल्टिमेट दिला जात असून या अल्टिमेट चा कंत्राटदारावर कुठलाही फायदा होत नाही तसेच पालकमंत्र्यांनी सुद्धा अनेक वेळा संबंधित कंत्राटदाराला अल्टिमेटम दिला. मात्र या पालकमंत्र्यांच्या अल्टिमेटम ला सुद्धा कंत्राटदार जुमानत नसल्याने कंत्राटदार किती मुजोर आहे यावरून स्पष्ट होते.
तसेच अमृत योजनेच्या कामाची गती पाहता आणखीन किती महिने यवतमाळकरांना अमृत योजनेच्या माध्यमातून बेंबळा प्रकल्पाचे मिळणारे पाणी पिण्यास मिळणार कि नाही हा एक गहन प्रश्न आहे. त्यातच कंत्राटदाराने यवतमाळ शहरामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले असून जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतलेले आहे.तसेच या योजनेच्या माध्यमातून यवतमाळ शहरामध्ये संपूर्ण भागात खोदून ठेवले असून ज्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहे.त्यांची डागडुजी करण्याचे काम यवतमाळ शहरातील एका कंत्राटदाराला मिळाली असून त्या कंत्राटदाराने केलेल्या डागडुजीत तसेच काँक्रेटीकरण अवघ्या महिनाभरातच फुटत असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने यवतमाळकरांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.या गंभीर प्रकाराकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याचे मात्र कमालीचे दुर्लक्ष होत असून या कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचेच काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये स्टेट बँक चौक ते पूनम चौक मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने खोदुन ठेवलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास भाई अमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार केली जाईल असा इशारा यावेळी भाई अमन यांनी दिला आहे.










































