
.
रावेर (शेख शरीफ)
रावेर येथे पंचायत समिती समोर निळे निशान सामाजिक संघटनेच्यावतीने एकदिवसीय निदर्शने करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बावीस्कर यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत समिती सेंस फंड यामध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झालेला आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून देखील दखल घेतली गेली नाही. अशा भ्रष्ट सदस्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्यांची चौकशी होऊन संबंधित ठेकेदावरवर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
अतिक्रमित लोकांना राहत असलेल्या जागेवर घरकुल देण्यात यावे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेवुन लाभ घेणाऱ्या ग्रामसेवकांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. पुरी गोलवाडे येथील आर.के.चौधरी ग्रामसेवक यांनी बेलदार समाजाच्या महिलेला ग्रामपंचायत मधुन हाकलुन दिले. त्या ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी निदर्शकांनी केली.
पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सभापती, उपसभापती यांच्या नावांवर पती काम करीत आहेत. बंद दार चर्चा करण्यात येते येथे निवडून आलेल्या सभापती, उपसभापती यांचे पती कार्य करतात हे चुकीचे आहे. याला गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल त्यांना पाठिशी घालतात दिपाली कोतवाल तुम्ही भष्ट्राचारी लोकांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला पण जेल मध्ये पाठविणार असा इशारा आनंद भाऊ बावीस्कर यांनी यावेळी दिला.
यावेळी संघटनेचे नियोजन समिती अध्यक्ष महेश तायडे, सदाशिव निकम सुधीर सैमिरे विजय धनगर, नारायन सवर्णे यांचे सह असंख्य महिला पुरुष पोलीस उपनिरिक्षक शितलकुमार नाईक यांचेसह चोख बंदोबस्तात ही निदर्शने करण्यात आली.











































