Home नांदेड आ. केराम यांच्या कार्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी….

आ. केराम यांच्या कार्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी….

333

 

प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट,दि १५ :- बंजारा समाजाचे अराध्य दैवत जगतगुरू राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती आ. भिमरावजी केराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज उत्साहात साजरी करण्यात आली.
आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी आमदार भीमरावजी केराम यांच्या किनवट येथील लोकरार्पण जनसंपर्क कार्यालयात तमाम बंजारा समाजाचे अराध्य दैवत जगत गुरु तथा महान तपस्वी संत श्री. सेवालाल महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. दरमेयान सर्वप्रथम राष्ट्रसंत सेवालाल महाराज याच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या पावन स्मृतीस विनंम्र अभिवादन करण्यात आले. तद्नंतर महाप्रसादाचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी किनवट नगर पंचायतचे नगराध्यध्य आनंद मच्छेवार यांच्यासह प्रकाश कुडमेथे स्वीय सहाय्यक आ. केराम, ऍड. प्रतीक भिमरावजी केराम, नीलकंठ कातले, अनिल तिरमनवार, मारोती भरकड, संतोष मरस्कोल्हे, उमाकांत क-हाळे, अजय चाडावार, बबलू नाईक, बालाजी भिसे, नरेश शिरमनवार, शिवा आंधळे, बालाजी धोत्रे, देवराव आडे, सतीश बिराजदार, स्वागत आयनेनीवार, दिलीप बोबले, अनिल कनाके, गजानन शिवणकर, जितू कुलसंगे, गजानन मसादवार, राजू मेश्राम, पिंटू गिनगुले, आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिका-यांची उपस्थिती होती.