Home नांदेड मूलीचे प्रेम संबंध मान्य नसल्यामुळे वडील व भावाने केली प्रियकराची हत्या ,

मूलीचे प्रेम संबंध मान्य नसल्यामुळे वडील व भावाने केली प्रियकराची हत्या ,

316

 

नांदेड : प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन तरुण-तरुणींच्या आयुष्याने भयावह वळण घेतलं. प्रेमसंबंधास मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता, आणि या विरोधातूनच सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर प्रियसी मृत प्रियकराच्या घरी गेली अन् अंत्यविधी पूर्वी मृतदेहासमोरच त्याच्या नावचं कुंकू कपाळावर लावलं. एका चित्रपटासारखा वास्तववात उतरल्याप्रमाणे हा प्रसंग घडला.

प्रकरण काय?

नांदेड शहरातील जुना गंज भागात हत्येचा थरार घडला होता. प्रेम संबंधाचा विरोध असलेल्या मुलीच्या बापाने दोन्ही मुलांसह त्याच्या मित्रासोबत मिळून सक्षम ताटे याची निर्घृणपणे खून केला. सुरुवातीला गोळी झाडली त्यानंतर फरशी डोक्यात घालून हत्या केली. सक्षम ताटे आणि आचल मामीलवार यांच्यात प्रेम संबंध होते. दोघांनी अनेक स्वप्न पाहिलीत. त्यांच्या प्रेमाची भनक आचलच्या कुटुंबाना लागली.
धक्कादायक म्हणजे हत्येच्या दोन तासापूर्वी मुलीची आई जयश्री मामीलवाड मयताच्या घरी जाऊन धमकी दिल्याची चर्चा आहे. दरम्यान प्रियकराच्या हत्येनंतर प्रियसी ही त्याच्या घरी रहायला गेली. सक्षमचा मृतदेह घरी आणताच तिने टाहो फोडला. अंत्यविधी पूर्वी तिने हळद आणि कुंकू लावून घेतलं शिवाय कपाळावर सिंदूर भरला. शिवाय सक्षमला देखील हळद लावण्यात आली. हा प्रसंग पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
माझ्या आई-वडिल आणि भावाला फाशी द्या
माझं आणि सक्षमच तीन वर्षापासून प्रेम संबंध होते. माझ्या घरच्यांना मान्य नव्हते, सक्षम जेल मधून सुटून आल्यानंतर माझ्या घरचे त्याच्या खुनाचा कट रचत होते. मला ही धमकी देत होते असे आरोप आचल मामीलवाडने केले. जातीय वादातून खून करण्यात आलाय, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि न्याय द्यावा अशी विनंती आचलने केली आहे. सक्षम आता नसलं तरी आमचं प्रेम आहे, मी त्याच्या घरी त्याची विधवा बनून राहणार असं ती म्हणाली.

आंचलच्या वडिलांसह 5 जणांना अटक ,

पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामिडवार यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामिडवार,साहील ठाकूर,सोमाश लखे,वेदांत अशी आरोपींची नावे आहेत. सक्षम ताटे आणि आणि आंचल यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हे कळताच आंचलचे वडील गजानन भयानक संतापले होते. सक्षम हा वेगळ्या जातीचा असल्याने त्यांना आंचलचे सक्षमसोबतचे प्रेमसंबंध मान्य नव्हते