
या गंभीर हल्ल्यानंतर अमरावतीमधील नागरिकांच्या प्रतिक्रीया काय आहेत? वाचा सविस्तर वृत्त-.
मनिष गुडधे – 8999776984
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्यावर काल दुपारी राजापेठ येथील उडाणपुलावर शाई फेकण्यात आली, या घटनेचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून या कृत्याचा निषेध सुरू झाला. या घटनेमध्ये आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभीमान पक्षाच्या महीला पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे पुढे आले आहे आणि त्यांच्यावर गुन्हासुध्दा दाखल झाला. याच घटनेनंतर आज आमदार रवि राणा यांच्यावरही कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनपा आयुक्तावर शाईफेक करण्याचा प्रकार अतिशय निषेधार्ह आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मुळात फ्लायओव्हरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसविण्याच्या विषयात युवा स्वाभिमानी पक्षाने कुठल्याहीही प्रोसेसचे पालन केले नाही. लोकशाही प्रक्रियेत एखाद्याला लहर आली आणि काही केलं,असे होत नसते.अर्थात रवी राणांचे संपूर्ण राजकारणच या प्रकारातील आहे. त्यांना महाराजांबद्दल खरंच आदर असेल तर त्यांनी मनपात अधिकृत ठराव आणावा. सभागृहाची मंजुरी मिळवावी. अशी नौटंकी करण्यात काहीही अर्थ नाही
आमदार रवि राणांवर दाखल झालेली कलम ३०७ काय आहे? राणांना जामिन मिळणार का?आय पी सी ३०७म्हणजे खुनाचा प्रयत्न, ज्याला हाफ मर्डर असेही म्हणतात, ज्याला मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो उपचारा करिता ऍडमिट झाला तर कलम ३०७ दाखल होते आणि नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कलम ३०२ लावले जाते. ३०७ मध्ये माणूस ऍडमिट असे पर्यत जामीन मिळणार नाही, दोन्ही गुन्हे जामीनपात्र नाहीत, अटकेनंतर ९० दिवसात दोषारोप पत्र न्यायालयात गेल्यास केस संपेपर्यंत जामीन नाही, बाकी जामीन देणे न देणे न्यायालय परिस्थिती व गुन्ह्याची स्थिती, पुरावे, पाहून ठरविते.आमदार रवि राणांवर कलम ३०७ दाखल झाल्यानंतर आमदार रवि राणा म्हणतात की, ही घटना घडली तेव्हा ते दिल्ली येथे होते. घडलेल्या घटनेचा त्यांनी निषेधही केला मात्र ज्या व्यक्तींवर शाईफेक प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत, ते व्यक्ती आ. रवि राणा यांचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे. तसेच पुलाची पाहणी करण्याकरिता आ. राणा स्वत: येणार आहेत, त्याकरिता मनपा आयुक्तांनी उपस्थित रहावे असा संदेश मनपा आयुक्तांना देण्यात आला होता. याचवेळी ही शाईफेकीची घटना घडल्यामुळेच आ. राणांकडे या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार म्हणून पाहील जात आहे.अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही- पालकमंत्री यशोमती ठाकूर
मनपा आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर वर शाई फेकण्याची घटना ही दुर्भाग्यजनक असल्याचे सांगून पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकुर यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की, अशा प्रकारचे हल्ले अधिकाऱ्यांवर होत असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार काही लोकांकडून आगामी होत असलेल्या मनपा निवडणुका लक्षात घेऊन अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था दुषित करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. परंतु अमरावतीची जनता समजदार आहे त्यामुळे या ठिकाणी शांतता व सौहार्दतेचा मुळीच भंग होणार नाही, तसेच आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिस करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. घडलेल्या घटनेच कुणीही समर्थन केलेल नाही. या घटनेनंतर अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच प्रकरण?-
अमरावती शहरातील राजापेठ येथील उडाणपुलावर खुल्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला होता. या पुतळ्याकरीता कुठल्याही प्रकारची परवानगी न घेतली गेल्याने कडक पोलीस बंदोबस्तामध्ये मध्य रात्री हा पुतळा हटविण्यात आला. यामुळे आ. राणा आणि खा. नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन केले. परीणामी त्यांना पोलीसांनी त्यांच्या निवासस्थानीच नजरकैदेत ठेवले होते. या घटनेनंतर अमरावती शहरामध्ये वारंवार या घटनेचे पडसाद उमटत आहेत. वेगवेगळी आंदोलने करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम युवा स्वाभीमान पक्षामार्फत केले जात आहे.










































