Home जळगाव साखळी उपोषण ३२ व्या दिवशी सुद्धा सुरू , “आंबेडकर वादी जन...

साखळी उपोषण ३२ व्या दिवशी सुद्धा सुरू , “आंबेडकर वादी जन संघटनांचा सहभाग बुरा न देखो ,बुरा ना सूनो, बुरा ना बोलो ,यावर आधारित निषेध”

37
0

शरीफ शेख

रावेर , दि. २८ :- २३ डिसेंबर पासून जळगाव मुस्लिम मंच यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयाबाहेर भारतीय नागरिकत्व कायदा, एन आर सी व एन आर पी ला विरोध करण्यासाठी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा सोमवार ३२ वा दिवस जळगाव येथील विविध रिपब्लिकन पक्षातील घटकांनी एकत्रित येऊन आंबेडकर वादी जनसंघटना जळगाव द्वारे मुस्लिम मंच धरणे आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
बुरा ना देखो ,बुरा ना बोलो ,बुरा न सुनो यावर आधारित निषेध

आंबेडकर वादी जनसंघटना व मुस्लिम मंच सभासदत्व यांनी एकत्रित येऊन आपल्या तोंडावर कानावर व डोळ्यांवर दोघी हात लावून भारत सरकारच्या भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध नोंदविला आंबेडकर वादी जन संघटनेचे सर्वश्री मुकुंद भाऊ सपकाळे, चंदन बिराडे,प्रा. प्रीती लाल पवार, प्रा चंद्रमणी लभाने, हरिश्चंद्र सोनवणे, संजय सपकाळे, संजय तांबे, भारत ससाने, दिलीप सपकाळे, ग्रूणात सैंदाणे ,भीका सोनवणे, सुरेश तायडे ,मा नगरसेवक राजू मोरे, जे डी भालेराव, यशवंत घोडेस्वार, आनंदा तायडे, बाबुराव वाघ, गौतम सपकाळे, भारत सोनवणे, नाना मगरे, संदीप सपकाळे, गौतम सपकाळे, पिंटू सपकाळे, प्रा. मोरे, प्रभाकर सुरवाडे, किरण वाघ यांनी मार्गदर्शन व जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधि विकास लाडवंनजारी यांना निवेदन सादर केले तसेच २५ जानेवारी शाह कुटुंबीयांचे धरणे आंदोलनाचे निवेदन सुद्धा देण्यात आले.
सदरचे निवेदन रऊफ खान ,शेख खलील टेलर ,युनुस कासम ,सहिद जनाब ,शरीफ शाह बापू, वसीम शाह बापू ,शेख वाजिद व अल्ताफ शेख यांनी सादर केले.
*औरंगाबाद येथील कार्यशाळेतून अब्दुल करीम सालार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती संकलित केली वती उपोषण आर्थी समोर सादर केली*
तसेच गफार मलिक, फारुक शेख, अल्ताफ शेख ,यांच्यासह प्रीती लाल पवार, गुरुनाथ सैंदाणे हरिश्चंद्र सोनवणे, लवंगारे सर, जेडी भालेराव ,एडवोकेट आयुब सिकलिगर ,संजय तांबे ,मुकुंद सपकाळे ,भारत ससाने, मोहम्मद रेहान ,सचिन धांडे ,शरीफ शाह यांनी सुंदर असे संभाषण उपोषण आर्थी सोबत केले.
उपोषणाची सुरवात जमात-ए-इस्लामी चे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांच्या कुराण पठाणाने करण्यात आली.

आजच्या उपोषणस्थळी आंबेडकर वादी जन संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय अशी होती ३२ व्या दिवशी प्रथमता एका इतर समाजातील तरुणाईने उघडपणे या मंचा द्वारे भारतीय नागरिकत्व कायद्याला आपला विरोध नोंदविला व पूर्णपणे उपोषणात सहभागी झाले त्याबद्दल मुस्लिम मंच चे समन्वयक फारुक शेख, डॉक्टर अमानुल्ला शाह, प्राध्यापक डॉक्टर एकबाल शहा व ताहेर शेख यांनी त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Unlimited Reseller Hosting