Home विदर्भ Wardh Story – भीषण अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

Wardh Story – भीषण अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

1450

 इकबाल शेख ‌- वर्धा 

यवतमाळ / नागपूर मार्गावर वर्ध्याच्या सेलसुरा येथे मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव कारचा भीषण अपघात झाला.. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन पुलाच्या खाली कोसळून मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.. हे सात विद्यार्थी एमबीबीएसला सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते.. मृतकामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाचे आमदार विजय रहांगडाळे यांचा मुलगा आविष्कार याचा समावेश आहे. इतर सहा जण विविध भागातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आले होते. सातही जण एका मित्राच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी यवतमाळला गेले होते, असं सांगण्यात आलं.. परत येताना हा अपघात झाला..

सेलसुरा येथील भदाडी नदीच्या पुलावरून अनियंत्रित वाहन खाली कोसळले.. यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.. ही माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढलेत..

यात सात जनांपैकी सहा जण सावंगी मेघे रुग्णालयातील होस्टेलवर राहत होते. यातील एक जण बाहेर राहत होता. 10 वाजेपर्यंत हे मुलं हॉस्टेलवर परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांना सांगण्यात आले असल्याची माहिती दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे माहिती दिली.

यात मेडीकलकॉलेजचे सात विद्यार्थी अपघातात मरण पावणे अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण यापुढे अशा घटना घडू नये यांसाठी बैठक बोलावून तात्काळ उपाययोजना केल्या जाईल, अशी माहिती डॉ. अभ्युदय मेघे यांनी दिली.