Home विदर्भ वर्धा-तुळजापूर मार्गावर कार अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा-तुळजापूर मार्गावर कार अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

806

रवींद्र साखरे 

सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी  अपघात, भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक सुपूत्राचा समावेश

वर्धा तुळजापूर मार्गावर देवळी नजीकच्या सेलसुरा गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. झायलो कार यवतमाळ येथून नागपूरला जात असताना पुलाच्या खाली कोसळली. या गाडीमधील सात ही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीला दीड वाजताच्या सुमारास भरधाव कारच्या समोरून वन्यप्राणी आडवा गेल्याने प्राण्याला वाचवण्याचा नादात चालकाचे नियंत्रण सुटून पुलाच्या खाली कोसळल्याने घडला अपघात.
सावंगी रुग्णालयात मेडिकलचे शिक्षण घेत होते. यात नीरज चव्हाण एमबीबीएस पार्ट 1 ला ,आविष्कार विजय रहांगडाले एमबीबीएस पार्ट 1ला, नितेश सिंग एमबीबीएस ला, विवेक नंदन एमबीबीएस पार्ट1ला, प्रत्युश सिंग एमबीबीएस पार्ट 2 ला, शुभम जयस्वाल पार्ट 2 ला, पवन शक्ती एमबीबीएस पार्ट1 सावंगी येथील मेडिकल विद्यालयात शिक्षण घेत होते. यातील एका मित्राचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करण्याकरिता यवतमाळ येथे गेले होते परत येताना ह्या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.जवळपास 40 फूट पुलावरून कार खाली पडल्याने हा भीषण अपघात झाला आहे. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.


या अपघातादरम्यान भंडारा जिल्ह्यातील तिरोडा मतदार संघाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलाचा अपघतात समावेश आविष्कार विजय रहांगडाले याचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षक ही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आले आहे