Home उत्तर महाराष्ट्र राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू दीपक कपूर यांची पोलीस बॉईज असोसिएशन नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी...

राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू दीपक कपूर यांची पोलीस बॉईज असोसिएशन नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

295

नंदुरबार –  नंदुरबार येथील रहिवासी असलेले पोलीस बॉईज तसेच पोलीस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेले दीपक किशोर कपूर यांची आज दिनांक 21 / 01 / 2022 रोजी पोलीस बॉईज असोसिएशनच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे.

दीपक कपूर यांचे शिक्षण M.A. मानसशास्त्र झाले आहे. तसेच ते राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू असून , त्यांनी महाराष्ट्र बास्केटबॉल पंच म्हणून कामगिरी बजावली आहे. तसेच ते महाराष्ट्र संघचे मेडल प्राप्त संघ व्यवस्थापक असून नंदुरबार जिल्ह्यात त्यांची सामाजिक कार्यामध्ये उत्तम कामगिरी असून दीपक कपूर हे आदिवासी ब्रेगेड व भीम आर्मीचे नंदुरबार जिल्हा संघटक आहेत.

पोलीसांबद्दल व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल असलेली तळमळ आणि आत्मीयता पाहून दीपक कपूर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे. शासकीय विश्रागृहावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून दीपक कपूर यांच्या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व पुरुष जिल्हाध्यक्ष तसेच महिला आघाडी व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.