Home जळगाव आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन (पत्रकार संघटना) महिला प्रदेश अध्यक्ष पदी संगीता अंभोरे

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन (पत्रकार संघटना) महिला प्रदेश अध्यक्ष पदी संगीता अंभोरे

198

रावेर (शेख शरीफ)

भारत सरकार मान्यता प्राप्त आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन च्या महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी औरंगाबाद जिल्ह्यातील दैनिक झुंजार प्रजातंत्र च्या संपादिका संगीता आंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
     पत्रकार हितासाठी भारतभर कार्यरत असलेल्या आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन च्या महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी औरंगाबाद येथील दैनिक झुंजार प्रजातंत्र च्या संपादिका संगीता आंभोरे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद जी वाचस्पती यांच्या आदेशानुसार व केंद्रीय प्रभारी अजयकुमार मिश्र, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव), महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शिवाजीराव कांबळे (तुळजापूर), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (सातारा), महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तथा मुंबई विभाग प्रमुख प्रफुल्ल साळुंखे (चाळीसगाव-मुंबई), कला – चित्रपट व सांस्कृतिक मंच प्रदेश अध्यक्ष यश काळे (चाळीसगाव-मुंबई) यांचे अनुमतीने करण्यात आली आहे.
संगीता अंभोरे यांचे यांचे नियुक्ती बद्दल संघटनेचे राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी सातारा जिल्हाध्यक्ष मुकुंदराज काकडे, उपजिल्हाध्यक्ष गणेश जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे उपजिल्हाध्यक्ष स्वामी दळवी, विजय शेंबडे, प्रवीण शेंडगे,वाघोले काका, महिला पदाधिकारी सारिका गायकवाड, कविता शेंडगे, नम्रता काळे, सायली दिवाकर, धनेश्वरी, फरांदे, सारिका नागरे, विभागीय संपर्क प्रमुख विक्रम सावंत, गोविंद गोळे, नितीन सिनकर , मंदार तळणीकर, वाई तालुकाध्यक्ष, शशिकांत शिंदे, रविंद्र कुचेकर, रशीद खान, सह संघटनेच्या सर्व पत्रकार बंधू-भगिनींकडून अभिनंदन होत आहे.