Home मराठवाडा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान – पालकमंत्री अशोक चव्हाण

अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान – पालकमंत्री अशोक चव्हाण

125

राजेश भांगे

नांदेड , दि. 26 :- अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. व्यक्तीची भुक भागविणे हा सर्वात मोठा पुण्य आहे. नागरिकांना स्वच्छ, चांगल्या प्रतीचे भोजन विनामुल्य देण्याचे श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र नांदेडचे कौतुकास्पद कार्य आहे. गेल्या तीन वर्षापासून कै. शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालय, विष्णूपुरी येथे ही संस्था गरिब आणि गरजू रुग्णांना भोजन देण्याचे महत्वाचे कार्य करीत आहे. आता श्याम नगर येथील स्त्री रुग्णालयात मोफत अन्नछत्र सुरु करुन त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिपादन केले.

श्याम नगर स्त्री रुग्णालय येथे श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र नांदेडच्यावतीने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दररोज सांयकाळी अन्नछत्राच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डी. पी. सावंत, उपमहापौर सतिष देशमुख, श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुनिल शर्मा, ॲङ गजानन पिंपरखेडे, विजय गवारे, सुदेश मुक्कावार, प्रदीप तुप्तेवार, लक्ष्मीनारायण शर्मा, अशोक धनेगावकर, सुधाकर पांढरे, निलेश पावडे उपस्थित होते.
यावेळी मंत्री महोदयांनी रुग्णालयाची पाहणी केली व अन्नछत्राच्या कक्षाला भेट दिली. या कार्यक्रमात महिला, नागरिक मोठ्या उपस्थित होते.