Home मराठवाडा डाक जीवन विम्याचे विकास अधिकारी यांनी घेतली साहयक पोलिस आधीक्षकांची सदिच्छा भेट

डाक जीवन विम्याचे विकास अधिकारी यांनी घेतली साहयक पोलिस आधीक्षकांची सदिच्छा भेट

49
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि.२७ :- रोजी मा. डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली डाक जीवन विमा विकास अधिकारी श्री.सुरेश वाघमारे यांनी मा.साहयक पोलीस अधीक्षक श्री.मुंडे साहेबांची नवीन वर्षा निमित्ताने सदिच्छा भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या उपयोगी सर्वात जुनी फक्त कर्मचाऱ्यांसाठी हितकारी असणारी महत्वाची योजना डाक जीवन विमा योजना संदर्भात चर्चा करण्यात आली.
पोलीस कर्मचाऱ्यांना एकच ठिकाणी सर्व डाक विभागाच्या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने दिनांक ३ जानेवारी २०२० व ४ जानेवारी २०२० रोजी स्नेहनगर पोलीस कॉलनी नांदेड येथे डाक जीवन विमा योजना व ग्रामीण डाक जीवन विमा योजना माहिती व बंद पडलेल्या डाक जीवन विमा योजना जीवित करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नांदेड सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घ्यावा तसेच शून्य ते दहा वर्षातील मुलींसाठी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजना फॉर्म भरून घेण्यात येणार आहे तरी या योजनेचा लाभ घ्यावा. सुकन्या समृध्दी खाते योजनासाठी अधिक माहितीसाठी मार्केटिंग एक्सिकेटीव्ह मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड श्री.सुरेश सिंगेवार मोबाईल क्रमांक 7038829990 संपर्क करावा.