Home जळगाव जळगाव जिल्ह्यात महावितरणने शेतक-यांना पुर्वी प्रमाणे रात्रीचा १० तास वीजपुरवठा करण्यात यावा.तसे...

जळगाव जिल्ह्यात महावितरणने शेतक-यांना पुर्वी प्रमाणे रात्रीचा १० तास वीजपुरवठा करण्यात यावा.तसे न झाल्यास शेतक -यांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने व महावितरणने नोंद घ्यावी सोपान पाटील याची मागणी

187

रावेर (शेख शरीफ)

जळगाव जिल्ह्यात रावेर,यावल.मुक्ताईनगर. चोपडा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक वर्षांपासून महावितरण शेतक-यांना दिवसाला ८ तास रात्री १० तास वीज पुरवठा शेतीसाठी करीत होते. तीन चार महिन्या पासून महावितरणने शेतक-यांवर अन्याय करुन रात्रीचा विज पुरवठ्यामध्ये २ तासाची कपात सुरू केलेली आहे. यावर अधिक जाणून घेतले असता. कोळशाच्या कमतरतेमुळे काही दिवस कपात केली. परंतु महावितरणने शेतक-यांना कायम वेठीस धरले असुन एकप्रकारे शेतक-यांवर उपास मारीची वेळ आणलेली आहे. दिवसाच्या ८ तासाच्या पुरवठ्या मध्ये अनेक वेळा विज पुरवठ्यात खंड पडतो,तसेच दुरुस्तीसाठी अनेक वेळा विज पुरवठा खंडीत केला जातो,व कमी दाबाचा पुरवठा होतो.त्यामुळे शेतक-यांना दिवसाला शेतीच्या पाण्याचे नियोजन करणे अशक्य होत असते.रात्रीचा १०तास पुरवठा मध्ये, रात्रीचा त्रास सहन करुन शेतकरी पिकांना व केळीस पाणी देण्याचे नियोजन करीत असतात. यावर्षी खरीपाचा हंगाम अतिवृष्टी मुळे पुर्ण नष्ट झाल्याने ,शेतक-यांनी रब्बी हंगामात जास्तीची पिके घेण्याचे नियोजन शेतक-यांनी केलेले आहे. रब्बीचा हंगाम बहरलेला असुन त्यास आता जास्त पाण्याची गरज आहे.या दोन तास विज पुरवठा कपातीच्या निर्णयामुळे शेतक-यांना या हंगामास सुध्दा मुकावे लागणार आहे.त्यामुळे शेतक-यांचे भरुन न निघणारे नुकसान होणार आहे. त्यात शेतक-यांना न विचारता महावितरणने शेतक-यांच्या शेती पंम्पाचे हॉर्सपॉवर वाढवून,तसेच अव्वाच्या सव्वा विज बिलाचे दर वाढवून,व चौवीस तासाचे विज बिल अकारूण,शेतक-यांवर विज बिलाचा डोगर उभारुन शेतक-यांची अक्षरशा लुट केलेली आहे.ही सर्व मनमानी महावितरणने त्वरित थांबवावी व शेतक-यांना पुर्वी प्रमाणें रात्रीचा १०तास विज पुरवठा सुरळीत करावा, अनेक दिवसांपासून ९ ते १२ वाजेपासून रात्रीचा विज पुरवठा केला जातो. त्यात सुधारणा करून संध्याकाळी किंवा पहाटे लवकर विज पुरवठा फिरत्या वेळेचे नियोजन करावे.शेतक-यांना न्याय द्यावा.तसे न झाल्यास जिल्ह्यातील सर्व महावितरणच्या कार्यालयावर शेतक-यांचे आग्रहास्तव व हितासाठी कोणत्याही क्षणी मोर्चा काढून ठिय्या आंदोलने करण्यात येतील याची शासनाने व महावितरणने नोंद घ्यावी.व जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतक-यांच्या हितासाठी पुर्वी प्रमाणे १० तास वीजपुरवठा व्हावा आग्रहाची नम्र विनंती.सोपान बाबुराव पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा यांनी वरील मागणी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कृषी मंत्री ऊर्जा मंत्री पालक मंत्री जळगाव जिल्हाधिकारी जळगाव अधिक्षक जळगाव कार्यकारी अभियंता महावितरण सावदा यांना वरील मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेबांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविद्रभैय्या पाटील किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील कार्यालयीन सचिव संजय चव्हाण सरचिटणीस अशोक पाटील ग्रा.प सदस्य नामदेव पाटील ईत्यादी.