Home विदर्भ ग्रामसेवक मंगेश गाऊत्रे साहेब यांना निरोप देण्यात आला

ग्रामसेवक मंगेश गाऊत्रे साहेब यांना निरोप देण्यात आला

25
0

यवतमाळ / घाटंजी – ग्राम पंचायत चालबर्डी आणि वाचनालय व ग्रंथालयातर्फे ग्रामसेवक मंगेशजी गाऊत्रे यांची बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमर ‍अण्णा पाटील होते. विचारपीठावर सरपंचा नंदाताई कोडापे उपसरपंच यांचे प्रतिनिधी श्री प्रेम भाऊ तिरमनवार,श्री तुकाराम नेहारे,नवनियुक्त ग्रामसेवक हंसराजजी मेश्राम साहेब ग्राम पंचायतमधील सर्व सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ग्रामसेवक मंगेशजी गाऊत्रे साहेबांचं सत्कार श्री अमर अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ किशोर अगुवार यांनी केले. तर चालबर्डी येथील पोलिस पाटील श्री शुद्धोधन मोडक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी व वाचनालयातील सदस्य आणि नागरिकांनी परिश्रम घेतले.