Home बुलडाणा बायगाव खुर्द येथील पुलावरील खडा झाला जीवघेणा

बायगाव खुर्द येथील पुलावरील खडा झाला जीवघेणा

477

अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करणात येईल… विनोद नागरे


प्रतिनिधी:-(रवि अण्णा जाधव)
देऊळगाव राजा :-बायगाव खुर्द येथील पुलावरील खडा बनला जीवघेणा ह्या जीवघेणा रस्त्यावरून वहाण धारकांना आपला जीव मुठीत धरून वहाण चालवावे लागत आहे.बायगांव खुर्द येथील पूल अतिशय घातक झाला आहे.शेतकऱ्यांची ऊसाची वाहतूक सुरू आहे.ग्रामीण भागासारख्या ठिकाणी ट्राफिक होत आहे.रात्री बेरात्री नविन वाटसरू या रस्त्याने आला असता त्याला या खड्याची कल्पना नसल्यामुळे अपघात घडल्या शिवाय राहणार नाही. असा जीवघेणी खड्यामुळे यखांद्या वाटसरूला आपला जीव गमवावा लागणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपविभागीय अभियंता समाजिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा येथे निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तरी हा पूल लवकरात लवकर झाला नाही तर मोठी जिवीत हाणी होण्यास वेळ लागणार नाही.तरी या जीवितहानीला सार्वजनिक बांधकाम उपविभाग व संबंधित अधिकारी जबाबदार राहील.विनोद नागरे,(प्रहार) शेख आयुब शेख बिसमिल्ला ( उपसरपंच ), बायगांव खुर्द ग्रामस्थ, चिंचखेड, सुल्तानपूर,इसरुळ, या सर्व गावकऱ्यांनी मिळून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.