Home विदर्भ आजोबांचा आजीवर अतिप्रसंग आजीची पोलिसात धाव…

आजोबांचा आजीवर अतिप्रसंग आजीची पोलिसात धाव…

728

७० वर्षीय आजीवर एका आजोबाने अतिप्रसंग केल्याच्या नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात या घटनेची एकच चर्चा सुरू झालेली आहे.

मनिष गुडधे

अमरावती – ७० वर्षाच्या वृध्देवर बलात्कार करण्यात आल्याची घटना अंजनगाव सुर्जी तालुकयातील धाडी गावात उघडकीस आली. घराकडे जात असलेल्या वृध्देला पोहचवून देतो असे सांगून नराधमाने तिला उचलून जवळच्या शेतात नेले. वृध्देला त्या नराधमाचा उद्देश लक्षता येताच आरडाओरड सुरू केली परंतु त्या नराधमाने शेतात नेऊन अत्याचार केला या प्रकरणी अंजनगाव पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात आजी किराणा यासाठी रात्रीच्या वेळी गेल्या होत्या. दरम्यान ६५ वर्षीय साहेबराव इंगळे हे नराधम आजोबा त्यांना रस्त्यात भेटले आणि मी घरी सोडून देतो, या बहान्याने आजी वर अतिप्रसंग यांना नराधमाने केला आहे. याबाबत अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवुन आरोपीस अटक केली आहे. सध्या आरोपीला तुरुंगात रवाना करण्यात आलेला आहे.काकू तुला राहुटीवर सोडून देतो असे म्हणून घेऊन निघाला व वृध्देला उचलनू घेऊन जवळच्या शेतात घेऊन गेला. पिडितेने आरडाओरड केली परंतु नराधनमाने स अत्याचार केला. १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सदर घटना घडली. थंडीचे दिवस असल्याने तसेच सायंकाळनंतर नागरिक आपआपल्या घरात असतात व बाहेर फिरणे देखील कमीच आहे.त्यातच खेडेगावात थंडी जास्त असल्याने नागरिक शेतातून कामाहून घरी परतल्यानंतर बाहेर निघतही नाहीत. त्यातच अंधाराचा फायदा घेत नराधम साहेबरावने असा डाव साधला. या घटनेची तक्रार पिडीतेने रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी अंजनगाव सुर्जी पोलिसात केली. तक्रारीवरून आरोपी विरूध्द भांदविच्या ३७६,५११ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.