Home विदर्भ नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट,माहाराष्ट्र च्या जिद्दीला सलाम जिल्हाधिकार्यासह दोषी अधिकार्यांवर सक्त कारवाई...

नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट,माहाराष्ट्र च्या जिद्दीला सलाम जिल्हाधिकार्यासह दोषी अधिकार्यांवर सक्त कारवाई होणार…….!

150

यवतमाळ ( प्रतिनिधी ) – बहुचर्चित वर्धा- यवतमाळ- नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील करोडो रुपयांचा गौनखनीज भ्रष्टाचार प्रकरणात अखेर २ वर्षांपासून सतत पाठपुरावा करून करोडो रुपयांच्या गौनखनीज भ्रष्टाचार प्रकरणातील दोषी अधिकारी तसेच कंत्राटदार यांचेवर सक्त कारवाई ची सुरुवात झाली.

सविस्तर वृत्त असे की यवतमाळ येथील बहुचर्चित वर्धा- यवतमाळ- नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील करोडो रुपयांचा गौनखनिज कंत्राटदार, उपकंत्राटदार यांनी राज्य शासनाच्या संबंधित खात्यातील काही भ्रष्ट बड्या अधिकार्यांशी संगनमत करून खुल्या बाजारात विकला . याबाबत सर्व साक्षी पुरावे देऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी कींवा जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले.
परंतु CRVD दिल्ली (Centre Railway Vigilance Department)
मध्य रेल्वेच्या दक्षता खात्याच्या टीमने NUJ च्या तक्रारीची दखल घेत जायमोक्यावर जाऊन संपूर्ण जागेची तक्रारीनुसार पाहनी केली तसेच सखोल चौकशी करून मुख्य कंत्राटदार यांचेवर सक्त कारवाईला सुरुवात केली. तसेच करोडो रुपयांचा गौनखनीज भ्रष्टाचार प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारदार यांनी गेल्या २ वर्षांपासून तक्रार करुन पुरावे सुद्धा दिलेत परंतु राज्य शासनाच्या भ्रष्ट अधिकार्यांनी यावर फक्त ” टाइमपास” करून प्रकरण तब्बल २ वर्षांपासून ‌प्रलंबित ठेवले.त्यामुळे (१) झालेले व न भरुन निघणारे नैसर्गिक नुकसान,(२) दोषींना पळवाट, (३) दोषी अधिकार्यांची पाठराखण करुन भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे, (४) तसेच या करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराला राज्य शासनाचे अधिकारीच जबाबदार आहेत त्यामुळे यांचेवर सक्त व दंडात्मक कारवाई करीता उपलोकायुक्त न्यायालय, मुंबई येथे प्रकरण चालूच आहे, तसेच केंद्र सरकारच्या दक्षता विभागाच्या कारवाई अहवालामुळे म्हणजे ठोस पुराव्यामुळे दोषींवर त्वरित व सक्त कारवाई होणार हे निश्चित.