Home शिर्डी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची २१ व्या पाथर्डी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड...

साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची २१ व्या पाथर्डी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ,

481

 

श्रीरामपूर (शौकतभाई शेख ) 

श्रीरामपूर येथील इंदिरानगर मधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांची पाथर्डी येथे २५ डिसेंबर २०२१ रोजी होत असलेल्या कृष्णा भोजनालय साहित्य मित्र मंडळ आयोजित २१ व्या पाथर्डी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९:३० वाजता पुस्तक प्रदर्शन उदघाटन शाहीर भारत गाडेकर करणार आहेत. सत्र २ व ३ हे सकाळी १० ते १२ उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण होणार असून शिरूर येथील प्रसिद्ध साहित्यिक विठ्ठल जाधव हे उदघाटक आहेत तर संमेलन अध्यक्ष म्हणून श्रीरामपूर येथील साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये आहेत. राजेंद्र कोटकर हे स्वागताध्यक्ष आहेत. प्रमुख अतिथी म्हणून माजी संमेलन अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. कैलास दौड आणि पाथर्डी येथील प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर उपस्थित राहणार आहेत.
पाथर्डी येथील अष्टवाडा परिसरातील श्री.चौंडेश्वरी सांस्कृतिक भवन येथे दिवसभर होणाऱ्या या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण,विद्यार्थी काव्यवाचन, गायन, निबंध स्पर्धा, निमंत्रित कवींचे कविसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम, समारोप सोहळा होणार आहे.अशी माहिती अध्यक्ष रमेश वाधवणे, सचिव प्रा.संतराम साबळे यांनी दिली. तसेच भाऊसाहेब गोरे आणि डॉ.कैलास दौड यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्याशी चर्चा केली.
डॉ.बाबुराव उपाध्ये हे १९७८ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांची ४० पुस्तके विविध साहित्य प्रकारात प्रकाशित झाली आहेत.त्यांना विविध संस्थेचे ६० पुरस्कार लाभले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ०८ विद्यार्थी पीएच.डी.तर १७ विद्यार्थी एम.फिल. झाले आहेत.६० पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत.राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत त्यांचे ७५ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.विविध साहित्य संमेलनात त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. पाथर्डी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी प्राचार्य टी. ई. शेळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे,प्रा.शिवाजीराव बारगळ, पत्रकार प्रकाश कुलथे,राजेंद्र देसाई,शौकतभाई शेख, कवी- गीतकार बाबासाहेब पवार, डॉ. शिवाजी काळे, डॉ. रामकृष्ण जगताप, कवी प्रा.पोपटराव पटारे,सुभाष सोनवणे, राधाकिसन देवरे, एकनाथ डांगे, कवयित्री संगीता फासाटे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.