Home महत्वाची बातमी पत्रकारांनो तुमचे मुद्दे मांडणारे तुमचे लोकप्रतिनिधी कुठे?

पत्रकारांनो तुमचे मुद्दे मांडणारे तुमचे लोकप्रतिनिधी कुठे?

647

लोकशाहीचा चौथा स्तंभाला सत्तेत वाटा आहे कुठं?

(राम खुर्दळ) 

लोकशाहीचा चौथा स्तंभ,जनतेचा आरसा असलेल्या पत्रकारितेला अजूनही मूलभूत हक्कांपासून,अधिकारांपासून दूर ठेवण्यात आले आहे. समाजातील सर्वच घटकांच्या आस्थेच्या मुद्द्यांवर संसद,विधिमंडळ,संमेलने यात विचार होतो,त्यावर चर्चा होते,त्यावर सरकार त्या त्या घटकांच्या अधिकारासाठी निर्णय घेते,अश्या घटकांचे प्रतिनिधी शासकीय समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये,विधिमंडळ,संसदेत आहेत.मात्र पत्रकारिता सारखे लोकशाहीतील सामान्य माणसाची अभिव्यक्ती असणारे माध्यम त्यातील कष्टकरी उपेक्षित पत्रकारांना कुठेही संधी नाही की सत्तेत अश्या पत्रकारितेतील मूलभूत मुद्यांची जाणीव असणारा कष्टकरी सामान्य पत्रकारांना हक्काचे प्रतिनिधित्व आहे कुठं?यावर आता सर्वच वाढत्या पत्रकार संघटना,व जाणकार पत्रकारांनी गांभीर्याने विचार करायची गरज आहे.हा विचार जर केला नाही तर आपली उपेक्षा आपल्या हक्क अधिकाराला कुठंही जागा मिळणार नाही,हवं वास्तव आपण स्वीकारणार कधी?
सध्या अनेकांना सत्तेत वाटा हवा आहे,तो बहुतांशी घटकांना मिळाला ही आहे,समाजातील पत्रकार सोडले तर प्रत्येक घटकांचे प्रतिनिधी विविध शासकीय सत्तास्थानावर आहेत,ते त्या त्या घटकांसाठी लढत झगडत असतात,प्रसंगी आपल्या समुदायाच्या अधिकारासाठी जागते,व कृतिशील भूमिका घेतात,सरकार ही त्यांचा आवाज त्यांच्या मागण्यांवर योजना,सवलती आणत असते.विविध जाती धर्माचे,संप्रदायाचे,पक्षांचे, संघटनांचे , शिक्षक , वकील ,  डॉक्टरांचे लोकप्रतिनिधी संसदेत,विधिमंडळ,महामंडळ, व शासकीय समित्यांवर आहेत.मात्र लोकशाहीत जोखीम पत्करून समाजातील सर्व घटक,लोकांचे,नेत्यांचे अधिकाऱ्यांचे , उपेक्षितांचे , उद्योग , व्यावसायिक व व्यापारी , शेतकरी , मजूर,कामगारांचे,कलावंत, साहित्यिकांचे , सामाजिक समश्यांचे मुद्दे माध्यमाद्वारे प्रकाशात आणून त्या मुद्दयांना वाचा फोडण्यासाठी अविरतपणे राबणाऱ्या कष्टकरी,ग्रामीण/शहरी पत्रकारांना वाली तरी कोण्ही आहे का?याचे उत्तर वर्षानुवर्षे पत्रकारांच्या जीवावर मोठ्या झालेल्या संघटना व पत्रकार पदाधिकारी,विविध समित्यांवर,पदांवर केवळ शोभेचे बाहुले बनणाऱ्यानी दिले पाहिजे, किंवा आपण त्यांना तसे विचारले पाहिजे, मात्र आपण विचारत नाही अन ते सांगणार नाही,आपण केवळ पत्रकार दिन आला की सत्कार,पुरस्कार,सोहोंळ्यात व्यस्त होत असतो,
मात्र आपली वाट व आपल्या वाटेत आपलं अस्तित्व यावर आपण किती जागते आहोत?जितके सामाजिक राजकीय स्थितीवर आपण स्वतःला विद्वान समजतो तितके आपण आपल्या ज्वलंत मुद्द्यांवर उपेक्षेवर विवंचनेवर कधी विचार करणार?हा सवाल आता प्रत्येक खऱ्याखुऱ्या कष्टाला जगणाऱ्या पत्रकाराने स्वतःला राजकीय,शासकीय,सामाजिक व्यवस्थेला विचारायचा कधी?कित्येक पिढ्यांपिढया आपल्याला ना संरक्षण,ना कुठली योजना?ना उचित मानधन?ना पेन्शन?हे कितपत सहन करायचं?
अधिस्वीकृती असलेले बोटावर मोजता येतील इतके,त्यात काही बोगस घुसलेले मात्र यापासून वंचित लोकांचा विचार तरी करतात का?अश्या घटकांना ही हक्क मिळावे त्यांना ही अधिस्वीकृती मिळावी यासाठी मात्र कोणी विचार करत नाही,हेच वास्तव आहे,
आम्हाला ही स्वतःची पोळी भाजणारे नेते हवे असतात,आमच्या क्षेत्रात काही स्वहेतू ठेवून आलेली मंडळी ही आहेत मात्र ह्या मंडळी व्यतिरिक्त मोठी सामान्य पत्रकार मंडळी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे होऊनही या अमृतमोहोत्सवी वर्षात उपेक्षित आहे,हे वास्तव समजून घ्या,या गंभीर मुद्द्यांना वाचा फोडायची तर जसे शिक्षक आमदार,स्वीकृत आमदार,खासदार,विविध महामंडळे,नियोजन समित्या,स्थानिक स्वराज्य संस्थांत,शासकीय समित्यांत आपले पत्रकारांचे जाणकार प्रतिनिधी नेमले जावे,याकडे सरकारने कृतिशीलता दाखवावी याबाबत आपण लढणार कधी?आपला वाटा मागणार कधी?हा सवाल सर्व जाणकार पत्रकार,माध्यम कर्मीना आहे.

आपला-

राम खुर्दळ(राज्य उपाध्यक्ष)

पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र राज्य
मो’:- 9423055801