
रावेर (शेख शरीफ)
क्रांती ज्योती महात्मा जोतीबा गोविंदराव फुले यांचे स्मृती दिनानिमित्त रावेर येथे समस्त माळी समाज पंच मंडळ रावेर यांच्या तर्फे सकाळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला विधीवत पुजन करण्यात आले देशात महीलासाठी शैक्षणिक पाया रचण्याचे जनक , राजे छत्रपती शिवराय यांची समाधी प्रथम शोधून काढणारे, विधवा महीलेच्या मुलास दत्तक घेणारे, स्वता शिक्षण घेत पत्नी सावित्री फुले यांना शिक्षण देवुन मुलीची पहीली शाळा काढण्यात प्रमुख भुमिका असणारे , अनिष्ठ प्रथा यांना आपल्या सुसष्ट वाणीतुन व कतृत्वातुन विरोध करणारे द लीत लोकांना सर्वप्रथम स्वतः च्या वाड्यातील आड पाण्यासाठी खुला करून देणारे तसेच विशीष्ठ अश्या लोकाची ठेकेदारी मोडीत काढणारे फुले यांचा पुण्यतिथी १८२७ ते १८९० अघव्या ६३ वर्षाच्या जिवनात बरेच असे क्रांतिकारी कामे करणारे ते महात्मा फुलेच हेच करु शकतात आज २८ नोव्हेंबर स्मृतीदिन त्या प्रसंगी माळी समाज मुख्य विश्वस्त श्री प्रल्हादजी महाजन , अध्यक्ष गोटू शेठ महाजन , पद्माकर महाजन (माजी अध्यक्ष ) उमेश महाजन , सचीव विनोद पाटील,हिरामण महाजन , प्रल्हाद पाटील , मोतीराम महाजन , संजय महाजन (माजी अध्यक्ष ) , श्रीराम महाजन ,सुकलाल महाजन , समाधान महाजन , प्रकाश रतीराम महाजन , प्रकाश प्रभाकर महाजन , ईश्वर महाजन तसेच आजी माजी समाज सदस्य ,समाज बांधव यांनी पुतळ्यास पुष्पहार घालुन नमन केले त्यांच्या कार्यास स्मरण केले.











































