
प्रशांत नाईक
अमरावती जिल्हातील चांदुर रेल्वे येथे दि.14-11-2021ला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी भव्य संत्रा परिषद चे आयोजन केले होते.
यावेळी संत्रा परिषद मध्ये शेतकऱ्यांनि त्यांच्या व्यथा मांडल्या.

सरकारच्या शेतकऱ्यांन विषयी उदासीनता व वेगळा विदर्भ चा बुलंद आवाज यावेळी परिषदेचे उदघाटक वंचित बहुजन पक्षाचे सर्वेसर्वा मा. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.परिषदेला उपस्थित पक्षाचे सर्वेसर्वा मा. बाळासाहेब आंबेडकर, पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा आघाडी मा. निलेश विश्वकर्मा मा. धैर्यवर्धन पुंडकर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक तसेंच संत्रा उत्पादक संघांचे धनंजय तोटेतसेच वंचित बहुजन आघाडी चे राज्य कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी कार्यक्रमाला उपस्थित होते.पिकेवीचे मान्यवर अभ्यासक यांनी चांदुर रेल्वे ला नर्सरी देण्याचे जाहीर केले.परिषदेला उपस्थित मान्यवर व जनसमुदायाचे मा. निलेश विश्वकर्मा यांनी आभार व्यक्त केले.











































