Home नांदेड नांदेड – आमदार केराम यांनी घेतला वनोळा येथे जनता दरबार.

नांदेड – आमदार केराम यांनी घेतला वनोळा येथे जनता दरबार.

204

आमदार केराम यांचा माहुर तालुक्यातील अनेक गावांत जनता दरबाराचे आयोजन.

जनतेच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत माहुर तालुक्यात दौरा.

प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड

दि : १० :- किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांचा ठरल्याप्रमाणे माहूर तालुक्याचा नियोजित दौऱ्याला दिनांक 10 नोव्हेंबर रोजी वानोळा गावातून सुरवात झाली असून सकाळी 11वाजता वानोळा दुपारी 4वाजता कूपटी येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता, यावेळी तहसिलदार राकेश गिड्डे, ता. आरोग्य अधिकारी,आशिष पवार,गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, पोलीस निरीक्षक नामदेव रीठे, गट शिक्षण अधिकारी, व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वानोळा ग्रामस्थांसह यावेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या तक्रारीच्य माध्यमातून अनेक समस्या, व्यथा जनता दरबारात आमदार भीमराव केराम यांच्या समोर मांडल्या असता ग्रामपंचायत, विद्युत वितरण कंपनी संबधी अनेक प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी आमदार केराम यांचे आभार मानले यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष अनिल तिरमनवार, विधानसभा संयोजक अॅड. रमण जायभाये, जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, तालूका सरचिटणीस निळकंठ मस्के ,गोपू महामूने, यांचेसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.