Home मराठवाडा आई-वडील,संत आणि भगवंत हेच आपले नातेवाईक- निवृत्ती महाराज देशमुख

आई-वडील,संत आणि भगवंत हेच आपले नातेवाईक- निवृत्ती महाराज देशमुख

457

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

आजच्या परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवा आई-वडील,संत आणि भगवंत हेच खरे आपले नातेवाईक आहेत,त्यांचं ऐका,त्यांना कधी दुखवू नका बाकी नाते सर्व फापट पसारा आहे.संकटकाळी धाव घेणारे हे तीनच नाती आहेत,असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांनी येथे केले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मंगळवारी,ता. ९ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताहात त्यांचे किर्तन झाले.
महाराज पुढे म्हणाले की,ज्ञानेश्वरी आणि गाथेचा सार म्हणजेच हरिपाठ आहे.
ज्ञान आणि देव म्हणजे ज्ञानदेव
आपण देव नाही म्हणजे ज्ञान नाही.देव व्हायचे असेल तर ज्ञान पाहिजे.अख्ख जग तज्ञ आहे ,आमचा विटेवरचा विठ्ठल सर्वज्ञ आहे.ज्ञानी व्हायचे असेल तर चार शब्द लक्षात ठेवा निवृत्ती,ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे भक्तीचे मुळ आहे .परमार्थ नसलेला माणूस फायद्याचा नाही.मरण अटळ आहे.कोरोना काळात मरणाच्या भितीने लोकांनी गंद पुसले, माळकऱ्यांनी माळी काढल्या माळी काढून मेल्या पेक्षा माळकरी बनून मेलेलं केव्हाही चांगलंच .पुण्याई शिवाय परमार्थ नाही.कोरोनातून वाचले म्हणजे पुनर्जन्म समजा.आई -वडिल, संत आणि तिसरा भगवंत हेच आपले खरे नातेवाईक आहेत .कोण कुणाची बहीण, कोण कुणाचा भाऊ ,कुणी कुणाचे नाही .मोठ्यांच्या बुटाची पाॅलीस करून जगण्यापेक्षा …‌कोरोनामुळे सज्जन लोकांचे हाल झाले.
दिड वर्षात पहिल्यांदाच लोक हसले.ज्यांनी धर्म टिकवला त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.जिंदगी संपली माणसांची पण माणसं जागेवर नाहीत.समाजात खरं चालत नाही,स्तुती लागते लोकांना.नाही सगळे मतलबी आहेत.मोठ्यांच्या बुटाची पाॅलीस करून जगण्यापेक्षा …‌कोरोनामुळे सज्जन लोकांचे हाल झाले.
दिड वर्षात पहिल्यांदाच लोक हसले.ज्यांनी धर्म टिकवला त्यांच्याकडे दुर्लक्ष होत.जिंदगी संपली माणसांची पण माणसं जागेवर नाहीत.समाजात खरं चालतं नाही,स्तुती लागते लोकांना.व्यक्ती मेली तरी चालेल धर्म टिकला पाहिजे.आई वडिलांचा त्याग केला तेव्हा ज्ञानेश्वरी निर्माण झाली.हिंदू धर्म त्यागातून निर्माण झाला.संचिताचा भोग भोगायला तयार राहा,भोग भोगावेच लागणार आहेत.जीवन जगत असताना समाधान मानायचे असते.सत्याचा भडका होतो.आई बापानी श्रीमंती दिली नसली तरी संस्कृती दिली.