
महेंद्र गायकवाड
नांदेड – देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना आंबेडकरी मतदारांनी मोठ्याप्रमाणावर मतदान केले आहे
अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महासचिव बापूराव गजभारे यांनी दिली आहे.मतांचे विश्लेषण करताना ते म्हणाले कि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 28 हजार मतदान झाले होते तर मागच्या विधानसभा निवडणुकीत कुणी हि मोठा नेता प्रचाराला आला नसतांना 12 हजार मतदान झाले होते
हे प्रमाण हळू हळू ओसरत असून आंबेडकरी मतदारांमध्ये जनजागृती होत आहे.एका जातीच्या मतावर कुणीही निवडून येऊ शकत नाही आमची मते फक्त विभाजन करण्याच्या कमी येत आहेत हे लोकांना आता समाजत आहे.
महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी
संपूर्ण मतदारसंघात गावोगावी जाहीर सभा घेतल्या वस्त्या वस्त्यांमध्ये बैठका घेतल्या प्रत्येक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते प्रचार कार्यात लावले.आंबेडकरवादी मतदारांना साद घालताना त्यांनी
संविधान बदलू पाहणाऱ्या प्रवृत्तीना निवडणूक कोणतीही असो त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आंबेडकरी मतदारांनी मताचे विभाजन टाळावे असे आवाहन केले त्यास मतदारांनी प्रतिसाद दिला विशेषतः बुद्धीजीवी मतदारांनी वंचितला साफ नाकारले आहे त्याचे ज्वलंत उदा: म्हणजे वंचितला फक्त 1 पोस्टल मत मिळाले आहे. वंचितनी मते खाली नाही त्यामुळे धोका झाला या भाजपवाल्यांच्या प्रतिक्रिया हशास्पद असल्याचे गजभारे म्हणाले











































